नवी दिल्ली : वृत्तसंस्था – घर खरेदी करणार्यांसाठी चांगली बातमी आहे. देशातील मोठी हाऊसिंग फायनान्स कंपनी असलेल्या एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने 2020 होम लोन ऑफर सादर केली आहे. या ऑफरअंतर्गत रेडी टू मूव्ह होमसाठी होम लोनवर 6 ईएमआय माफ करण्यात येतील. याशिवाय अंडर कन्स्ट्रक्शन घर, फ्लॅटच्या लोनवर तुम्ही त्यावेळच्या प्रिन्सिपल रक्कमेवर पैसे भरावे लागतील जेव्हा घराचा ताबा मिळेल. म्हणजे तुम्ही घरात रहाल, तेव्हाच पैसे भरणार आहात. होम लोनवर व्याज दर 8.10 टक्के आहे.
15 जानेवारीपासू सुरू झाली ऑफर
ही ऑफर 15 जानेवारीला सुरू झाली असून ती 29 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. ऑफरचा फायदा 15 मार्चपासून मिळण्यास सुरूवात होईल. ऑफरमध्ये कमीत कमी 20 लाख रुपयांचे होम लोन मिळेल. याशिवाय कमाल 2 कोटी रूपये लोन घेता येऊ शकते.
प्रोसेसिंग फी
1 कोटीपर्यंतच्या लोनसाठी लोनच्या रक्कमेच्या 0.25 टक्के प्रोसेसिंग फी असेल, जी कमाल 10,000 रुपये आहे. तर 1 कोटी ते 5 कोटी रूपयांच्या रक्कमेवर 0.25 टक्के प्रोसेसिंग फी, कमाल 25,000 रुपये असेल. लोनची कालमर्यादा कमाल 30 वर्षांपर्यंत असेल.
रेडी टू मूव्ह होमवर ऑफर
एलआयसी एचएफएलच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, रेडी टू मूव्ह होमवर ऑफरमध्ये होम लोन घेतल्यावर 6 इएमआय माफ करण्यात येतील. या ऑफरमध्ये 2 ईएमआयची माफी 5व्या आणि पुन्हा दोनची 10व्या वर्षी आणि बाकीच्या दोन ईएमआयची माफी लोन कालावधीच्या 15व्या वर्षी मिळेल.
अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅटवर ऑफर
एलआयसी एचएफएलच्या ऑफरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या घरांसाठी पझेशन मिळेपर्यंत प्रिंसिपल रक्कम भरावी लागणार नाही. हे लोन बांधकाम सुरू असलेल्या घर अथवा फ्लॅटसाठी आहे. हे लोन घेणार्याचा डिफॉल्ट फ्री ट्रॅक रिकॉर्ड असणे गरजेचे आहे.
Visit : bahujannama.com