नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) एलआयसी सहाय्यक भरती २०१९ च्या प्राथमिक परीक्षेमध्ये नवीन बदल केले आहेत. भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) एलआयसी सहाय्यक भरती २०१९ च्या प्राथमिक परीक्षेसाठी सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत. सुधारित परीक्षेची तारीख अधिकृत वेबसाइट licindia.in वर उपलब्ध आहे.
जीवन विमा निगमने एलआयसी सहाय्यक प्राथमिक परीक्षा २०१९ च्या सुधारित तारखा सांगून अधिकृत नोटीस बजावली आहे. अधिसूचनेनुसार सर्व प्रभागांसाठी प्राथमिक परीक्षेच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. आता प्राथमिक परीक्षा ३० आणि ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी घेण्यात येईल.
पहिली प्राथमिक परीक्षा २१ आणि २२ ऑक्टोबर २०१९ रोजी होणार होती. एलआयसीच्या संकेतस्थळावर जाऊन उमेदवार अधिकृत नोटीसमधून सुधारित परीक्षेच्या तारखां तपासू शकतात. भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) १ ऑक्टोबर २०१९ पूर्वी ८५०० सहाय्यक (लिपीक) पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अर्ज मागविले होते.
Visit : bahujannama.com