नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Leena Nair | जगभरातील मोठ मोठ्या कंपन्यांमध्ये भारतीयांची संख्या वाढत आहे. FMCG कंपनी युनिलिव्हरच्या चीफ ह्यूमन रिसॉर्सेज ऑफिसर लीना नायर (unilever human resources officer leena nair) आता फ्रान्सच्या लक्झरी कंपनी चॅनेलच्या (Chanel) ग्लोबल CEO पदाची जबाबदारी (Chanel global CEO) स्वीकारणार आहेत. त्यांनी यूनिलीवर येथे एचआर पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, लीना मूळच्या महाराष्ट्रातील कोल्हापूरची (Kolhapur, Maharashtra) आहे. (Leena Nair)
सुवर्णपदक विजेती लीना नायर –
महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमधून (holy cross convent school) शालेय शिक्षण घेतलेल्या लीना नायरने सांगलीतील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग (walchand college of engineering sangli) पूर्ण केले आहे. त्यानंतर तिने जमशेदपूरच्या झेवियर्स स्कूल ऑफ मॅनेजमेंट xavier school of management jamshedpur (XLRI) येथून एमबीए केले आहे. लीना हि तिच्या बॅचची सुवर्णपदक विजेती होती.
ट्रेनिंग ते CHRO पर्यंतचा प्रवास –
लीनाच्या (Leena Nair) प्रवासाची सुरुवात सर्वांना प्रेरणा देते. लीनाने 1992 मध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 2016 पर्यंत ती या कंपनीत CHRO पदावर पोहचली. त्याचबरोबर यूनिलीवरचा राजीनामा दिल्यानंतर तिने सोशल मीडियावर लिहिले की, मी यूनिलीवरमध्ये काम केले याचा मला नेहमीच अभिमान वाटेल. मला इथे खूप प्रेम आणि आदर मिळाला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
2013 मध्ये लंडन शिफ्ट –
53 वर्षीय लीना नायर यांनी लिहिले की चॅनेल (Chanel) ही एक प्रतिष्ठित कंपनी आहे. त्यामध्ये काम करणे हि एक मोठी गर्वाची गोष्ट आहे. 2013 मध्ये भारतातून लंडनमध्ये स्थलांतरित झालेल्या लीनाचा गेल्या महिन्यात फॉर्च्यून इंडियाने मोस्ट पावरफुल वुमेन लिस्टमध्ये समावेश केला होता. चॅनेल जॉईन केल्यानंतर लीनाने सोशल मीडियावर मिळणाऱ्या शुभेच्याबद्दल सर्वांचे आभार मानले. प्रत्येकाला उत्तर देणे अवघड आहे,पण मी प्रत्येकाची कंमेंट वाचत आहे. तसेच मी सर्वांचे आभार मानते.
चॅनेलची ग्लोबल सीईओ (Chanel global CEO) बनल्यानंतर, लीना नायर त्या भारतीयांच्या यादीत सामील झाली आहे
ज्या भारतीय वंशाच्या असून जगातील सर्वात मोठ्या कंपनीला लीड करत आहेत.
नुकतेच भारतीय वंशाचे पराग अग्रवाल (parag agarwal) ट्विटरचे (twitter) नवे सीईओ बनले आहेत. याआधी गुगलचे (googel) सुंदर पिचाई (sundar pichai), मायक्रोसॉफ्टचे (microsoft) सत्या नडेला (satya nadella)आणि पेप्सिकोच्या (pepsico) इंद्रा नूयी (indra nooyi) यासारखी भारतीय नावे जगभर आपली चमक पसरवत आहेत.
Web Title :- Leena Nair | leena nair now lead french brand chanel as global ceo quits unilever chro.
Bombay High Court | अनिल देशमुख प्रकरणात हायकोर्टाचा ठाकरे सरकारला दणका, CBI ला तपास करण्याची मुभा
OBC Reservation Maharashtra | ठाकरे सरकारला धक्क्यावर धक्के, आता ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक