बीड : बहुजननामा ऑनलाईन – दि.6 जानेवारी रोजी दर्पणदिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा दलाचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष तथा छात्रभारतीचे महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष वारे यांचे ‘सद्यस्थितीत माध्यमांसमोरील आवाहने’ यावर परखड व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानाचा आणि दर्पणकार पुरस्कार सोहळ्याचा लाभ बीड जिल्ह्यातील पत्रकार आणि माध्यमातील विविध क्षेत्रात काम करणार्या मान्यवरांसह पत्रकार प्रेमी सुजान नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे बीड जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी यांनी केले आहे.बीड येथील स.मा. गर्गे भवन, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या पाठीमागे येथील सभागृहात दि. 6 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने प्रतिवर्षी दिला जाणारा बीडचे दर्पणकार या पुरस्काराचे वितरण छात्रभारतीचे महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष वारे यांच्या शुभहस्ते दै. प्रजापत्रचे संपादक सुनील क्षीरसागर यांना या वर्षीचा बीडचे दर्पणकार 2020 या पुरस्काराने सहकुटूंब सन्मानित करण्यात येणार आहे.
या पुरस्कार सोहळ्यानंतर सुभाष वारे यांचे ‘सद्यस्थितीत माध्यमांसमोरील आवाहने’ यावर परखड व्याख्यान होणार आहे. सुभाष वारे यांनी राष्ट्रीय सेवादल आणि छात्रभारतीच्या माध्यमातून देशभरात विद्यार्थी चळवळीला न्याय देत समाजातील अन्यायावर प्रहार करत वैचारिक बीज रोवले आहे. बीड जिल्ह्यात सुभाष वारे यांचे पत्रकारांच्या कार्यक्रमानिमित्त पहिल्यांदाच माध्यमावर व्याख्यान होणार असल्याने जिल्ह्यातील तमाम पत्रकार बांधवांसह राष्ट्रीय सेवादल, छात्रभारती सह बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या व्याख्यान पर्वाचा लाभ घ्यावा तसेच बीड जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेते आणि ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा देखील मान्यवरांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात येणार असल्याने बीड जिल्ह्यातील तमाम वृत्तपत्र विक्रेत्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून सन्मान स्विकारावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी यांनी केले आहे.
वसंत मुंडे आणि संतोष मानूरकर यांचा मुख्य सत्कार
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र वसंत मुंडे यांच्या रुपाने महाराष्ट्रात पहिल्यांदाच ग्रामीण भागातील तरुणाला थेट राज्यातील बुध्दीवंत पत्रकारांचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. पत्रकारीतेच्या माध्यमातून बीड जिल्ह्याची शान या निमित्ताने वाढली आहे. त्याच बरोबर बीड जिल्हा पत्रकार संघाचे संस्थापक तथा ज्येष्ठ पत्रकार संतोष मानूरकर यांनी पत्रकारीते सोबत स्काऊट गाईड चळवळीला नाविन्यपूर्ण उपक्रमातून एक नवा चेहरा दिला. त्यांचे योगदान लक्षात घेवून महाराष्ट्र शासनाने स्काऊट गाईडच्या मुख्य राज्य आयुक्तपदी निवड केली आहे. या दोन्ही निवडी बीड जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रात लौकीक करणार्या ठरल्यामुळे बीड जिल्हा शाखेच्यावतीने या दोन सत्कारमूर्तींचा विशेष मुख्य सत्कार करण्यात येणार आहे.
शासन, माध्यम आणि संवाद यावर गणेश रामदासी यांचे व्याख्यान
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय औरंगाबाद विभागाचे संचालक गणेश रामदासी यांचे शासन, माध्यम आणि संवाद या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान होणार आहे. माध्यमातील बदलते शासन निर्णय आणि माध्यमातील अडचणी यावर संवादातून यशस्वी मार्ग कसा काढायचा यावर दिशा देणारे व्याख्यान होणार असल्याने या व्याख्यानाचा बीड जिल्ह्यातील तमाम पत्रकारांना, संपादकांना याचा विशेष लाभ होणार आहे.
Visit : bahujannama.com