बहुजननामा ऑनलाइन टीम – पोस्ट खात्याने बचत खात्यातील शिल्लक रकमेबाबत नवीन नियम (new-rules-regarding-postal-
पोस्टाच्या बचत खात्यात सध्या सर्वांत कमी रकमेची मर्यादा ही 50 रुपये आहे. मात्र, आता 11 डिसेंबरपासून या बचत खात्यात किमान पाचशे रुपये असणे गरजेचे आहे. ज्या बचत खातेदारांच्या खात्यावर 500 रुपयांपेक्षा फारच कमी रक्कम आहे, त्यांनी 11 डिसेंबरपर्यंत त्यांच्या खात्यातील शिल्लक कमीत कमी 500 किंवा त्यापेक्षा जास्त राहील, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन नगर डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक जे. टी. भोसले यांनी केले आहे. ज्या खातेदारांच्या खात्यातील रक्कम 500 रुपयांपेक्षा कमी असेल, अशा खात्यातून मेंटेनन्स चार्जेस म्हणून 100 रुपये व कर अशी रक्कम वजा केली जाणार आहे. खात्यात 100 रुपयांपेक्षा कमी शिल्लक असेल तर असे खाते प्रणालीतून आपोआप बंद केली जाणार आहेत. तसेच 500 रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या खातेदारांनी त्यांची गैरसोय टाळण्यासाठी 11 डिसेंबरपर्यंत बचत खात्यात किमान 500 रुपये शिल्लक राहतील, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोस्ट विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.