नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कालच (गुरुवार दि 5 सप्टेंबरपासून) जिओ फायबरची घोषणा झाली आहे. ग्राहकांना प्लॅन आणि सुविधांची माहिती ही मिळाली आहे. 42 व्या अॅन्युअल जनरल मीटींगमध्ये रिलायांसन जिओ फायबरची घोषणा झाली होती. रिलायंसने यात 6 वेगवेगळे प्लॅन लाँच केले आहेत. कंपनीने देशातल्या 1600 शहरांमध्ये ही सर्व्हिस लाँच केली आहे. कंपनीने वक्तव्य केलं आहे की, जिओ फायबर भारतातील पहिली 100 % ऑल फायबर ब्रॉडबँड सर्व्हिस आहे. याचा सुरुवातीचा स्पीड 100 MBPS असेल आणि हा स्पीड 1 GBPS पर्यंत असणार आहे.
जर तुम्ही अॅन्युअल प्लॅन सब्सक्राईब केला तर तुम्हाला 5000 रुपयांचा फ्री जिओ होम गेटवे, केबल टीव्ही कनेक्शनसाठी जवळपास 6400 रुपयांचा 4K सेट टॉप बॉक्स मिळणार आहे. जो प्लॅन तुम्ही निवडत आहात त्यानुसार तुम्हाला 24 इंचापासून 32 इंच HD किंवा 43 इंच HD चा 4 K टीव्हीही मिळणार आहे.
‘अशी’ मिळवा जिओ फायबर सर्व्हिस
– www.jio.com ला व्हिजिट करा किंवा MyJio app डाऊनलोड करा.
– जिओ फायबर सर्व्हिससाठी रजिस्टर करा.
– जर जिओ फायबर तुमच्या भागात उपलब्ध असेल तर सर्व्हिस रिप्रेझेंटेटीव्ह तुम्हाला संपर्क करतील
– MyJio app डाऊनलोड करा. कारण युजर्ससोबत सर्व कम्युनिकेशन इथूनच होतं.
– मंथली, क्वार्टरली किंवा अॅन्युअली रिचार्ज केल्यास प्रत्येक जिओ युजरला एक सेट टॉप बॉक्स मिळेल.
जिओ फायबरमध्ये काय काय मिळणार ?
1) अल्ट्रा हाय स्पीड ब्रॉडबँड
2) फ्री डोमेस्टीक व्हाईस कॉलिंग, काँफ्रेंसिंग आणि इंटरनॅशनल कॉलिंग
3) टीव्ही व्हिडीओ कॉलिंग
4) गेमिंग
जिओ फायबरचा मंथली प्लॅन 699 रुपयांनी सुरु होऊन 8499 रुपयांपर्यंत असेल
1) सर्व प्लॅन्सचा स्पीड 100MBPS ने सुरु होईल.
2) तुम्ही जास्तीत जास्त 1GBPS स्पीड मिळवू शकता.
दीर्घकालीन प्लॅन
1) जिओ फायबरच्या युजर्ससाठी 3,6 आणि 12 महिन्यांचा प्लॅन उपलब्ध असेल.
2) बँक टायअपच्या माध्यमातून जिओ आकर्षक EMI प्लॅन देणार आहे. यात ग्राहकांना ईएमआय अदा करून वार्षिक प्लॅनचा लाभ मिळणार आहे.
Reliance Industries Limited च्या AGM दरम्यान Jio Forever Plan नुसार कंपनीने एचडी किंवा 4K एलईडी टीव्ही देण्याचीही घोषणा केली आहे.
प्रिव्ह्यु ऑफरची व्हॅलिडीटी
सध्याचे जिओ फायबरचे युजर्स पेड प्लॅनमध्ये ट्रान्सफर केले जातील. यासाठी त्यांना कंपनीसोबत संवाद साधावा लागणार आहे. तात्पुरती ते सर्व्हिस युज करत राहतील.
- ‘रक्तदान’ करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ ७ गोष्टी, अन्यथा होईल वाईट परिणाम
- तारुण्यातच टक्कल पडले असल्यास तुमच्यासाठी आहेत ‘हे’ रामबाण उपाय
- ‘हळद’ आरोग्यासाठी चांगली, परंतु या लोकांनी चुकूनही सेवन करू नये
- चहापत्तीने ‘केस’ होतात काळे, करून पाहा ‘हे’ ५ घरगुती उपाय
- लग्नानंतरही बिपाशा बसु आहे फिट, जाणून घ्या तिचे 11 ‘ब्युटी सिक्रेट’
- हातांच्या तळव्यांना पाहून कळतात ‘लिव्हर डॅमेज’सहीत ‘हे’ ५ आजार, जाणून घ्या
- ‘सोनम कपूर’लाही आहे ‘डायबिटीज’, रुग्णांनी ‘या’ ४ गोष्टींची घ्यावी काळजी
- बुद्धी तल्लख, तर अॅलर्जी होईल दूर, काही दिवस रोज खा ‘पाइन नट्स’
केवळ अशा लोकांनाच असते ‘सरोगेसी’द्वारे अपत्यप्राप्तीची परवानगी