लातूर : बहुजननामा ऑनलाईन – Latur News | शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. तेथील उषाकिरण टॉकीज (ushakiran talkies Latur) समोरच्या परिसरात थांबलेला ऑटोरिक्षावर एक मोठं झाड कोसळलं आहे. त्या अचानक दुर्घटनेत रिक्षाचालकाचा दुर्देवी जागीच मृत्यू (Death) झाला आहे. ही घटना गुरूवारी (22 जुलै) रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. मारोती सिद्राम काळे (वय, 48 रा. चांडेश्वर) असं मृत रिक्षाचालकाचे नाव आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, उषाकिरण टॉकीज (Ushakiran Talkies Latur) समोरच्या परिसरात थांबलेला एका ऑटोरिक्षा क्रमांक (एम.एच. 24 ए.बी. 3168) झाड कोसळल्याची घटना घड्ली आहे. तर, मागील काही दिवसांपासून लातूर शहर व परिसरात रिमझिम पाऊस सुरू आहे. मात्र, हिरवे झाड कसे काय कोसळले याचा शोध घेतला जातोय. दरम्यान त्या रिक्षामध्ये आणखी एक व्यक्ती होता. त्याला किरकोळ मार लागला आहे. याप्रकरणी अधिक माहिती पोलीस (Police) घेत आहेत.
Web Title :- Latur News | tree rickshaw collapsed and shattered driver was killed and one was injured
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 333 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी