नवी दिल्ली : वृत्तसंस्था- मद्यसम्राट विजय मल्ल्या याची फ्रांसीसी द्वीपवरील १७ लक्जरी बेडरूम खाली असून एका मोठ्या बँकेने कोर्टात मल्ल्याची फ्रांसीसी द्वीपवरील इले सेंट मार्गेरिटावर असलेली १.३ हेक्टरची मालमत्ता खूप काळ रिकामी असून तिचा लिलाव करण्यात यावा, यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या बातमीनुसार या मालमत्तेत हवेलीबरोबर एक सिनेमा हॉल, हेलिपॅड आणि नाईटक्लबही असून १७ लक्जरी बेडरूम आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला मुंबईमधील स्पेशल कोर्टा Prevention of Money Laundering Act ने स्टेट बँकेसह इतरही बँकांना आर्थिक गुन्हेगार विजय मल्ल्याची संपत्ती विकून आपापले कर्ज वसूल करण्यास परवानगी दिली.
मल्ल्याने कतार नॅशनल बँकेच्या युनिट Ansbacher & Co कडून सुमारे 210 कोटी रुपयाचे कर्ज घेऊन ही मालमत्ता खरेदी केली होती. मल्ल्याने कर्ज वाढवण्याच्या विनंतीनंतर बँकेने मालमत्तेचे मूल्य तपासण्याचे निर्देश दिले असताना रिअल इस्टेट अधिकाऱ्यांना त्याची किंमत 10 दशलक्ष युरोने कमी झाल्याची आढळून आली.