नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्याला पॅन कार्ड आणि आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. त्याचबरोबर ज्यांनी कोणी पॅन कार्ड आधार कार्डला लिंक केले नसेल त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. पॅन कार्ड लिंक करण्याची तारीख जवळ आली आहे. प्राप्तिकर विभागाने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची तारीख पुढे वाढवून दिली आहे. ज्यांनी पॅन कार्ड अजूनही आधार कार्डशी लिंक केले नसेल त्यांनी लवकरात लवकर करावे.
सगळ्यांना माहित आहे की, दोन व्यक्ती किंवा दोन कंपन्यांचे पॅन नंबर एकसारखे नसतात. पण जर कोणाकडे दोन पॅनकार्ड सापडले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्यांच्यावर 10 हजार रुपयांचा दंड लागू शकतो. काही जणांकडे दोन पॅनकार्ड असेल त्यांनी त्वरित ते जमा करावे. जर तुम्हाला कोणत्या कायदेशीर कारवाईच्या कचाट्यात अडकायचे नसेल तर आज आम्ही तुम्हाला या संबंधित माहिती सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही दुसऱ्या पॅनकार्डपासून मुक्तता मिळवू शकता.
अशा मध्ये तुम्हाला काय करावे लागेल ?
एका व्यक्तीकडे एकापेक्षा दोन पॅन कार्ड असेल तर दुसरे जमा करण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करु शकता. यासाठी एनएसडीएलची वेबसाइट किंवा ऑफिसला जाऊन Request For New PAN Card Or/ And Changes Or Correction in PAN Data करावे लागेल. हा फॉर्म भरल्यानंतर तो जमा करणे गरजेचे आहे. फॉर्म भरण्याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे…
1. फॉर्ममध्ये जे पॅन कार्ड स्वतः कडे ठेवायचे आहे त्याचा उल्लेख सर्वात वर करावा. त्यानंतर फॉर्मचा आयटम नंबर 11 मध्ये भरावा. त्याशिवाय ज्या पॅन कार्डला रद्द करायचे आहे, त्याची कॉपी फॉर्मबरोबर लावणे गरजेचे आहे.
2.काही लोक वेगवेगळ्या लोकांसाठी पॅन कार्ड तयार करतात. डीमॅट खात्यासाठी वेगळा पॅन आणि इन्कम टॅक्सचे पेमेंट आणि रिर्टनसाठी वेगळे पॅन कार्ड तयार करा.
3. काहीजण जुने पॅन कार्ड हरविल्यानंतर नवीन पॅनकार्ड तयार करतात. त्यामुळेही काही जणांकडे अनेक पॅन कार्ड असतात.
4. डीमॅट खात्यासाठी आणि इन्कम टॅक्सचं पेमेंटसाठी वेगवेगळे पॅन दिलेले असल्यास एक पॅन कार्ड जमा करावे लागेल. या दोन्ही ठिकाणी एकच पॅन कार्ड नंबर द्यावा लागेल. दुसरे पॅन कार्ड जमा करुन आधीच्या पॅन कार्डची माहिती पाठवून द्यावी.