मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Lata Mangeshkar Health Update | मागील अनेक दिवसांपासून जेष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार घेत आहेत. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीबाबत वेगवेगळी माहिती डाॅक्टरांकडून देण्यात येत आहे. सकाळीच लतादीदींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती. आता मात्र लतादीदी उपचारांना प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. (Lata Mangeshkar Health Update)
लतादीदींची प्रकृती पुन्हा एकदा खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. डॉक्टरांचं पथक त्याच्यावर 24 तास लक्ष ठेवून आहे. अशी माहिती डॉ. प्रतित समदानी (Dr. Pratit Samdani) यांनी सकाळी दिली होती. दरम्यान आताच्या नव्या माहितीनूसार, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी लता दीदींवर रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्या उपचारांना योग्य प्रतिसाद देत असल्याचे सांगितले जात आहे. (Lata Mangeshkar Health Update)
दरम्यान, कोरोनाची लागण झाल्यानंतर लता मंगेशकर यांना 8 जानेवारीला मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीविषयी वेगवेगळी अपडेट समोर येत आहेत. तेव्हापासून ‘लतादीदी लवकर ब-या होऊन घरी परत यावेत,’ अशा प्रार्थना जगभरातून केल्या जात आहेत.
Web Title :- Lata Mangeshkar Health Update | lata mangeshkar responding to treatment says treating doctor of breach candy hospital Dr. Pratit Samdani
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत किंचित घसरण; जाणून घ्या लेटेस्ट भाव