नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय शोधत असाल तर तुमच्यासाठी एक खास पर्याय आहे. या पर्यायाचा फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे आता अवघे 2 दिवस उरलेले आहेत. श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्सच्या नॉन कन्व्हर्टेबल डिबेन्चर (NCD) चा हा पर्याय आहे. या एनसीडीमध्ये तुम्ही 22 जानेवारीपर्यंत पैसे गुंतवू शकता. येथे 7 वर्षांच्या गुंतवणुकीवर 9.10 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. बँक एफडीच्या तुलनेत एनसीडीमध्ये मिळणारे व्याज जास्त आहे. मागील काही वर्षात ज्या पद्धतीने गुंतवणुकदारांचा कंपनीच्या एफडीमध्ये विश्वास वाढला आहे, तो पाहता गुंतवणूक करण्याची ही सुवर्णंसंधी आहे.
बँक एफडीपेक्षा 2% जास्त व्याज
मागील एक वर्षात देशातील टॉपच्या सरकारी आणि खासगी बँकांनी आपल्या डिपॉजिट रेटमध्ये सरासरी 50 बेसिक पॉइंटपर्यंत कपात केली आहे. ही 2015 नंतर 250 बेसिक पॉइंटपेक्षा कमी झाली आहे. अशात कंपन्यांच्या एफडीमध्ये गुंतवणूक वाढत आहे. जर कंपन्यांची रेटींग चांगली असेत तर गुंतवणुकीत जोखीमही कमी होते. चांगल्या रिटर्नच्या शोधात असलेल्या गुंतवणुकदारांसाठी श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्सचा नॉन कन्व्हर्टेबल डिबेन्चर चांगला पर्याय होऊ शकतो.
जाणून घ्या कंपनीचे वेगवेगळे प्लान
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स 3 वर्ष, 5 वर्ष आणि 7 वर्ष म्हणजे 26 महीने, 60 महीने आणि 84 महीन्यांच्या मॅच्युरिटी कालावधीसाठी 8.85 टक्के, 9 टक्के आणि 9.1 टक्के वार्षिक व्याज देत आहे. यामुळे कंपनीच्या 7 वर्षांच्या एनसीडीवर मिळणारे व्याज बँकेच्या एफडीच्या तुलनेत सुमारे 210 बेसिक पॉइंट जास्त आहे. श्रीराम ट्रान्सपोर्टमध्ये मंथली आणि अॅन्युअल इन्टरेस्ट रेट पर्यायासोबत 3 आणि 5 वर्षांसाठी कम्युलेटीव्ह पर्यायसुद्धा आहे. श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्सच्या इश्यूची बेस साईझ 200 कोटी रुपयांची आहे, यामध्ये 1000 कोटी रुपयांपर्यंत ओव्हरसब्सक्रिप्शनचा सुद्धा पर्याय आहे.
किती करू शकता गुंतवणूक
एनसीडीच्या एका बाँडची फेस व्हॅल्यू 1000 रुपये आहे आणि कमीत कमी 10 बाँडमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. म्हणजे किमान 10 हजार रुपयांची गुतवणूक करावी लागेल. यानंतर 1000 रुपयांच्या मल्टीपलमध्ये गुंतवणूक होऊ शकते. टाटा कॅपिटल हौसिंग मंथली आणि अॅन्युअल इंटरेस्ट रेटचा पर्याय देत आहे. या एनसीडीची लिस्टिंग शेयर बाजारात करण्यात आली आहे.
Visit : Bhaujannama.com