लासलगाव – दीपावली आणि साप्ताहिक सुट्टी अशा ७ दिवसांनंतर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरू झाले. लाल कांद्याच्या सरासरी भावात एक हजार पाचशे रुपयांची वाढ होत लाल कांद्याला सरासरी ४६०० रुपये दर मिळाला तर तर उन्हाळ कांद्याच्या सरासरी भावात १०० रुपयांची वाढ होत सरासरी ३७०० रुपयांचा दर मिळाला.
११ नोव्हेंबर रोजी उन्हाळ कांद्याला सरासरी ३६०० लाल कांद्याला ३१०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला होता. हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू झाल्याने कांद्याच्या मागणीमध्ये वाढ झालेली आहे यंदा परतीच्या पावसाने उन्हाळ आणि लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कांद्याचे उत्पादन घटले आहे यामुळे कांदा भाव खातांना दिसत आहे.
आज सकाळच्या सत्रात उन्हाळ कांद्याला कमीत कमी १३०० सरासरी ३७०० तर जास्तीत जास्त ४४०१ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला लाल कांद्याला कमीतकमी ३००१,सरासरी ४६०० तर जास्तीत जास्त ५१०० रुपये भाव मिळाला.