लासलगाव : बहुजननामा ऑनलाइन – नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या लासलगाव ग्रामपंचायत सरपंचपदी ग्रामविकास पॅनलचे जयदत्त सिताराम होळकर यांना 17 पैकी 10 मते मिळाल्याने तर हे तर उपसरपंचपदी अफजल शेख यांना 17 पैकी 10 मते मिळाल्याने मतदानाने झालेल्या निवडणुकीत विजय झाला. तर विरोधी गटाचे सरपंचपदाचे उमेदवार रोहीत बाळासाहेब पाटील हे 7 मते तर उपसरपंचपदाकरीता सौ. ज्योती गणेश निकम यांना 7 मते मिळाल्याने पराभुत झाले. आज लासलगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात निवडणुक निर्णय अधिकारी महेश नागपुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच व उपसरपंचपदाची निवडणुक घेण्यात आली.
सरपंचपदाकरीता जयदत्त सिताराम होळकर, सायली संजय पाटील व रोहीत बाळासाहेब पाटील या तिन ग्रामपंचायत सदस्यांनी तर उपसरपंच पदाकरीता अफजल नसीर शेख व सौ. ज्योती गणेश निकम यांनी दोन उमेदवारी अर्ज नेले होते. यापैकी सरपंचपदाकरीता डाॅ. सायली सजय पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यामुळे सरपंचदाकरीता व उपसरपंचपदाकरीता दोन उमेदवारी अर्ज शिल्लक राहील्याने अमोल थोरे यांनी मतदान घेण्याची मागणी केली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी महेश नागपूरकर यांनी निवडणूक घेण्याचे जाहीर केले. त्यास लासलगावचे तलाठी नितीन केदार व लासलगावचे ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी सहाय्य केले.
या बैठकीस ग्रामविकास पॅनल चे विजयी सदस्य चंद्रशेखर गोविंदराव होळकर, सौ. अनिता अक्षय ब्रम्हेचा, डॉ. कुमारी सायली संजय पाटील, नानासाहेब दत्ताजी पाटील, अफजल नासिर शेख, सौ रेवती गुणवंत होळकर, सौ. पुष्पा पंडित आहिरे, सौ. योगिता योगेश पाटील, जयदत्त सीताराम होळकर, रामनाथ मगन शेजवळ परिवर्तन शहर विकास आघाडी चे विजयी सदस्य सौ. अश्विनी नामदेव बर्डे, रोहित बाळासाहेब पाटील, अमोल सुदाम थोरे, सौ सुवर्णा ज्ञानेश्वर जगताप, सौ. संगीता कल्याणराव पाटील व संतोष रामकीसन पलोड व ज्योती गणेश निकम हेे सतरा नवनिर्ववाचित ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर संजय पाटील, गुणवंतराव होळकर, शंतनु पाटील, सौ. रंजना पाटील, सौ. निता पाटील, सौ. वेदिका होळकर, डाॅ. विकास चांदर, संतोष ब्रम्हेचा, अक्षय ब्रम्हेचा, मिरान पठाण, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
निफाड तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या लासलगाव ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत जयदत्त होळकर व नानासाहेब पाटील गटाच्या ग्रामविकास पॅनलने १७ पैकी १० सदस्य विजयी होऊन बहुमत प्राप्त झाला आहे. तसेच माजी आ. कल्याणराव पाटील व डी के जगताप, प्रकाश दायमा यांच्या परिवर्तन शहर विकास पॅनलचे ७ सदस्य विजयी झाले आहेत.