लासलगाव : बहुजननामा ऑनलाईन – येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर मंदिराचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने माजी सरपंच संतोष दगडे यांच्या मातोश्री श्रीमती चंद्रकला दगडे यांच्या गळ्यातून तीन तोळ्याची सोन्याची पोत लांबवण्याची घटना भरदिवसा घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
याबाबत लासलगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की लासलगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संतोष फुलचंद दगडे यांच्या आई चंद्रकला या सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास देव दर्शन घेऊन घराच्या कंपाउंड मध्ये प्रवेश करत श्रीराम मंदिर कुठे आहे असा पत्ता अज्ञात मोटरसायकल वरून आलेल्या दोन युवकांनी विचारत दगडे यांच्या गळ्यातील सोन्याची 30 ग्रॅम वजनाची पोत ओढून पळून गेले आहे. या महिन्यात सलग दुसऱ्यांदा याच भागात दुसऱ्यांदा चैन ओरडण्याची घटना घडल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत लासलगाव पोलीस ठाणे मध्ये कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता.
गेल्या काही दिवसांपासून लासलगाव व परिसरांमध्ये मोबाईल चोरी,चैन ओढण्याचे प्रकार,मोटारसायकल चोरी आदी घटनांमध्ये वाढ झाली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची चुकवती रोख स्वरूपात होत असून मोठी उलाढाल होत आहे. पोलिसांनी या सर्व गोष्टीचा विचार करून वाढत्या घटनांना आळा घालण्याची मागणी लासलगावकर करत आहे