नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसची प्रकरणे पुन्हा एकदा जगभरात विक्रम मोडत आहेत. या दरम्यान एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्याने सार्स-सीओव्ही-2 बाबत जो जुना दृष्टीकोन आहे, त्याच्या उलट दावा केला आहे. जगातील प्रमुख आरोग्य मॅगझिन द लँसेटमध्ये प्रकाशित एका लेखात म्हटले आहे की, कोरोना व्हायरस हवेतून वेगाने पसरत आहे. रिपोर्ट लिहिणार्या लेखकांनी यापाठीमागे 10 कारण असल्याचे सांगितले आहे. ज्यांच्या द्वारे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, सार्स-सीओव्ही-2 हवेतून वेगाने पसरणारा आजार आहे.
तज्ज्ञांचा दावा आहे की, त्यांना समजले आहे की, संसर्गापासून वाचण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पुरेसे नाही. हा लेख अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडाच्या सहा तज्ज्ञांनी मिळून लिहिले आहे. ज्यात म्हटले आहे की, कोरोना व्हायरस हवेतून पसरणारा आजार नाही, ही गोष्टी सिद्ध करण्यासाठी आवश्यक आधार आहे, तर शास्त्रीय पुरावे काही वेगळेच सांगत आहेत. या तज्ज्ञांनी ताबडतोब कोविड-19 पासून वाचण्यासाठी प्रोटोकॉलमध्ये बदल करण्यास सांगितले आहे. आपले म्हणणे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी 10 कारणे सांगितली आहेत.
तज्ज्ञांच्या या 10 दाव्यांवरून स्पष्ट होते की, जगभरात व्हायरसपासून वाचण्यासाठी अवलंबण्यात आलेल्या रणनितीमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. लोकांनी ना केवळ बाहेर तर घराच्या आत सुद्धा प्रत्येक वेळी मास्क घालणे आवश्यक आहे. तज्ज्ञांनी हे सुद्धा म्हटले आहे की, जर संक्रमित व्यक्ती श्वास सोडत असेल, ओरडत असेल, गाणे गात असेल, शिंकत असेल किंवा खोकत असेल, तर त्या हवेत श्वास घेणारा व्यक्ती सुद्धा संक्रमित होऊ शकते. यावरून समजते की, जगात कोरोना व्हायरस महामारीपासून वाचण्यासाठी जी पद्धत अवलंबली जात आहे, तिच्यात बदल करण्याची आवश्यकता आहे.