नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लालू यादव हे चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा भोगत असून त्यांच्यावर रांचीमधील रिम्सच्या पेइंग वॉर्डमध्ये उपचार चालू आहेत. सोमवारी रात्री त्यांच्या दातात दुखणे असल्यामुळे ते झोपू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना मंगळवारी रात्री हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि त्यांची अक्कल दाढ काढण्यात आली.
डॉक्टरांनी सांगितल्यावर लालू यादव यांना कडक सुरक्षेत रिम्सच्या पेइंग वॉर्डमधील डेंटल विभागात नेण्यात आले. या विभागाच्या डॉ. बी. के. प्रजापती यांनी लालू प्रसाद यांचे उपचार केले.
अजूनतरी डॉक्टरांनी यादव यांना हलके काहीतरी खाण्याचा सल्ला दिला असून कोणत्याही प्रकारचे थंड खाद्य खाण्यास मनाई केली आहे. तसेच दोन दिवस चेहऱ्यावर सूज राहील, असे शंका व्यक्त केली आहे.
यादव हे चारा घोटाळ्याच्या अनेक प्रकरणात शिक्षा भोगत असून ते किडनीसह आणखी १५ आजारांनी ग्रस्त आहेत. यादव यांना ३ ऑक्टोबर २०१३ रोजी चारा घोटाळ्यात दोषी ठरवत पाच वर्षाचा तुरुंगवास आणि २५ लाखाचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यांना चारा घोटाळ्याच्या चार प्रकरणात दोषी ठरवले गेले होते. ते डिसेंबर २०१७ मध्ये तुरुंगात होते. रिम्समध्ये त्यांच्या इतर आजारांवर उपचार चालू आहेत.