Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणीवरून महायुतीत श्रेयवादाचे राजकारण रंगले; शिवसेना-राष्ट्रवादी पक्षात चढाओढ

Ajit Pawar-Eknath Shinde

मुंबई : Ladki Bahin Yojana | राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या प्रचार प्रसारासाठी महायुती (Mahayuti Govt) प्रयत्नशील आहे. मात्र, या योजनेच्या श्रेयासाठी महायुतीत सुप्त वाद सुरु असल्याचे चित्र आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट (Ajit Pawar NCP) आणि शिवसेना शिंदे गटात (Shivsena Shinde Group) चढाओढ सुरु झाली आहे. अजित पवार गटाच्या जाहिरातीमधून महायुतीच्या सर्व नेत्यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे वादाला तोंड फुटले आहे.

अजित पवार गटाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात पक्षाच्या सोशल मीडियावरुन नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये ‘मुख्यमंत्री’ हा शब्द वगळून ‘दादाचा वादा’ (Dadancha Wada) अशी टॅगलाईन वापरत लाडकी बहीण योजनेचा प्रचार करण्यात आला आहे. तसेच ‘अजित पवारांची लाडकी बहीण योजना’ असा उल्लेखही जाणीवपूर्वक जाहिरातीमध्ये करण्यात आला आहे.

या जाहिरातीमधून महायुतीच्या सर्व नेत्यांना वगळण्यात आले आहे. केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे. तसेच या योजनेसंदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी आणि महिलांना मदत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे.

या माध्यमातून अजित पवार यांच्याकडून जास्तीत जास्त महिलांना आपल्या पक्षाकडे आकृष्ट करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. मात्र, यावरुन आता राष्ट्रवादी अजित पवार गटात आणि शिवसेना शिंदे गटात वाद उदभवण्याची शक्यता आहे.