Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणीसाठी ‘आरबीआय’ कडून 3 हजार कोटींचे कर्ज; महायुती सरकारच्या निर्णयाने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री?

October 4, 2024

पुणे: Ladki Bahin Yojana | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून (Mahayuti Govt) अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र दुसरीकडे राज्याच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे.

दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकार विविध मार्गानं निधीची जुळवाजुळव करताना दिसत आहे . त्यामुळे दस्त नोंदणीसाठी आता १००-२०० रुपये नव्हे तर थेट ५०० रूपयांचा स्टॅम्प खरेदी करावा लागणार आहे. त्यामुळे लाडकीच्या निधीसाठी इतर योजनांनाही कात्री लागणार की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.

दरम्यान राज्य सरकारवर कर्जाचा डोंगर वाढत चालल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने रिझर्व्ह बँकेचे दार ठोठावले आहे. ३ हजार कोटींची मागणी केल्याची माहिती मिळत आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी २ कोटी ५२ लाख अर्ज करण्यात आले आहेत. या योजनेचे २ कोटी ४१ लाख अर्ज मंजूर झाले आहेत. १ कोटी ८५ लाख महिलांना योजनेचा लाभ मिळाला आहे. लाभार्थी महिलांना दर महिन्याला ३ हजार ६२० कोटींची गरज आहे. लाडकीसाठी वर्षाला ४३ हजार ४४० कोटींचा खर्च होणार आहे.