कोलकाता : वृत्तसंस्था – हजारो लिटर पाण्याने भरलेली अजस्त्र टाकी पत्त्यासारखी कोसळल्याची घटना पश्चिम बंगालमधील बांकुरा जिल्ह्यात घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काळजाचा थरकाप उडविणारे आणि धडकी भरवणारे हे दृश्य व्हिडिओच्या माध्यमातून लाखो युजर्सने आतापर्यंत पाहिले आहे. तुम्ही देखील हा व्हिडिओ पाहू शकता.
— Kranti Kanetkar (@Krantikanetkar2) January 23, 2020
बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास ही घटना घडली असून याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पोलीस ठाण्यात तक्रारदेखील दाखल झाली आहे. ही अजस्त्र टाकी कोसळल्यानंतर परिसर जलमय झाला होता. यामुळे अनेक गावांना पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. जेव्हा पाण्याची टाकी कोसळू लागली तेव्हा येथे राहणार्या लोकांनी हे दृश्य मोबाईल कॅमेरामध्ये शूट केले. या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
पाण्याच्या टाकीचे बांधकाम योग्यप्रकारे करण्यात आले होते का, तसेच तिची तपासणी डागडुजी वेळेवर होत होती का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण दोनच वर्षांपूवीही ही पाण्याची टाकी बांधण्यात आली होती, असे येथील प्रशासकीय अधिकार्यांनी म्हटले आहे. दोन वर्षांपूर्वी बांधलेली टाकी लगेचच कोसळली याचा अर्थ तिचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले असावे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Visit : bahujannama.com