बहुजननामा ऑनलाईन – कालच आलिया भट्टने (Alia Bhatt) एका गोंडस अशा मुलीला जन्म दिला आहे. यानंतर सर्वत्र आलियाला शुभेच्छा देण्यात येत आहे. यावेळी कमल आर. खाननेही (KRK) आलियाला शुभेच्छा दिल्या मात्र नेहमी प्रमाणे त्याची पोस्ट सध्या खूपच व्हायरल होत आहे. नेहमीच त्याच्या खोचक विधानाने चर्चेत असणारा स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमल आर खानने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आलिया आणि रणबीरला (Ranbir Kapoor) शुभेच्छा देत त्यांच्यावर खोचक टीका केली. जे नेटकरांना आवडले नसल्याने नेटकऱ्यांनी केआरके (KRK) वर संताप व्यक्त केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
केआरके (KRK) ने आपल्या ट्विटरवर असे म्हंटले आहे की, “सात महिन्यातच एका सुंदर मुलीचे पालक झाल्याबद्दल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना शुभेच्छा”. त्याचे हे ट्विट नेटकऱ्यांना अजिबातच आवडलेले नाही त्यावर अनेक युजर्सनी त्याला खूप काही सुनावले. त्याच्या या ट्विटवर कमेंट करत एका नेटकऱ्याने म्हटले की, “प्रत्येक गोष्टीत तुला उलट सुलट बोलायचेच असते का” तर दुसऱ्याने “नव्या प्रवासाची सुरुवात आहे तू काही चांगलं बोलू शकत नाही का चांगलं बोलता येत नसेल तर तोंड तरी बंद ठेव” तर एकाने “तू निर्लज्ज आहेस” अशा शब्दात नेटकऱ्यांनी केआरकेला चांगले सुनावले आहे.
https://twitter.com/kamaalrkhan/status/1589164413407612928
एप्रिल महिन्यात आलिया आणि रणवीरचे लग्न होताच जून महिन्यात आलियाने तिच्या चाहत्यांना ही गुड न्यूज
दिली होती. आलियाने मुलीला जन्म दिल्यानंतर सोशल मीडियावर अक्षय कुमार (Akshya Kumar),
अनुष्का शर्मा (Anushka Shrma), मोनी रॉय (Moni Roy), सोनम कपूर (Sonam Kapoor),
कपिल शर्मा (Kapil Sharma), श्वेता बच्चन (Shweta Bachhan), राखी सावंत (Rakhi Sawant)
याचबरोबर कटरीना कैफ (Katrina Kaif) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांनीही भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- KRK | fans criticises krk over tweet on alia bhatt ranbir kapoor becoming parents
हे देखील वाचा :
Prashant Damle | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशांत दामलें बाबत केली ‘ही’ मोठी घोषणा
T20 World Cup | सेमी फायनलमध्ये लढणाऱ्या भारताचे इंग्लंडविरुद्ध असे आहे रेकॉर्ड