बहुजननामा ऑनलाईन- देशभरातील लोक सोनी टिव्ही वाहिनीवरील कौन बनेगा करोडपती कार्यक्रमला प्रेक्षकांची पसंती आहे. गेल्या महिन्यात १९ ऑगस्टपासून या कार्यक्रमाच्या ११ व्या सत्राला सुरवात झाली. यात आतापर्यत दोन लोक एक करोडच्या प्रश्नापर्यंत पोहचले आहेत. परंतु अद्याप कोणीही करोडपती झाले नाही. मात्र या आठवड्यात झालेल्या भागात या सत्राचा पहिला करोडपती समोर आला आहे. सरोज राज असे या करोडपती तरुणाचे नाव आहे.
सरोज करोडपती झालेला भाग लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे. या भागाची एक झलक सोनी टिव्हीच्या इन्टाग्रामवर व्हीडीओद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. सरोज बिहारमधील जहानाबादयेथील शेतकरी कुटुंबात राहणारा तरुण आहे. तर भविष्यात आयएएस बनण्याचे त्याचे स्वप्न आहे. एक करोड जिंकल्यानंतर त्याला अभिनेता अमिताभ बच्चन यांनी तुम्ही एक करोड रुपये जिंकले असल्याची घोषणा केल्यावर त्याला याबद्दल काय वाटते विचरले असता तो म्हणाला, मला विश्वास बसत नाहीये की मी एक करोड रुपये जिंकले. यावेळी त्याने भविष्यात समाजासाठी काम करायचे असल्याचे सांगितले.
मात्र सरोज याठिकाणीच थांबणार नसून तो सात करोडच्या प्रश्नावरही खेळणार आहे. कार्यक्रमात यावेळी १६ प्रश्न विचारण्यात येत आहेत. तर विजयाची रक्कमही सात करोड आहे. आता हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे की, सरोज सात करोडवाला प्रश्न जिंकू शकतो की नाही. यापुर्वी शासकीय उड्डाण संस्थेत प्रशिक्षण घेणारा १९ वर्षाचा हिमांशू १६ प्रश्नांपर्यंत पोहचला होता. मात्र ५० लाख रुपये जिंकून त्याने खेळ थांबविला. त्यापुर्वी कामगार निरीक्षक चरणा गुप्ताही १ करोडच्या प्रश्नापर्यंत पोहचल्या होत्या. परंतु त्याही ५० लाखाच्या प्रश्नावर त्यांनीही खेळ थांबविला.
https://www.instagram.com/sonytvofficial/?utm_source=ig_embed