Kothrud Pune Crime News | पुणे: नोकरी लावण्याच्या बहाण्याने 94 लाखांचा गंडा, तलाठी, आरोग्य सेवक पदावर नोकरी लावण्याचे दाखवले आमिष
पुणे : – Kothrud Pune Crime News | आरोग्य विभागात मोठा अधिकारी असल्याचे सांगून मुलांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवले (Lure Of Job). नोकरी लावण्यासाठी पैसे घेऊन नोकरी न लावता 94 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे (Cheating Fraud Case). याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police Station) एका तोतया आरोग्य अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीत कोथरुड येथे घडला आहे.
याबाबत गोविंदराव गुणागिर गिरी (वय-53 रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, शात्रीनगर, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल विलास शिंदे Amol Vilas Shinde (वय-35 सध्या रा. जानता वसाहत, भोसरी, मुळ रा. मु.पो. माहुर जि. नांदेड तसेच खापरी, नागपुर) याच्यावर आयपीसी 406, 419, 420, 465, 468, 471 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने फिर्यादी यांच्यासह इतरांची आर्थिक फसवणूक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना तो अहमदनगर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक येथे आरोग्य विभागात मोठा अधिकारी असल्याचे सांगितले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन मुलाला व इतरांना तलाठी, आरोग्य सेवक, आरोग्य मित्र येथे कामाला लावतो असे सांगितले. मुलाला नोकरी लावण्यासाठी आरोपीने फिर्यादी यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यानुसार फिर्यादी यांनी अमोल शिंदे याला रोख व बँक खात्यात वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने 24 लाख 55 हजार रुपये दिले. तर साक्षीदार यांच्याकडून 69 लाख 5 हजार रुपये घेतले.
पैसे घेतल्यानंतर शिंदे याने फिर्य़ादी व साक्षीदार यांना बनावट नियुक्ती पत्र, बनावट आयकार्ड, ई-मेल पत्र, इतर बनावट कागदपत्र तसेच मार्क वाढवल्याचे खोटी कागदपत्र दिली. मात्र, कागदपत्र खोटी असल्याचे लक्षात आल्यानंतर गिरी व साक्षीदार यांनी अमोल याच्याकडे पैसे मागितले. तसेच कागदपत्र परत करण्याची मागणी केली. त्यावेळी शिंदे याने गिरी व साक्षीदार यांना शिवीगाळ करुन कागदपत्र जाळून टाकण्याची धमकी दिली. अमोल शिंदे याने नोकरी न लावता फिर्यादी व साक्षीदार यांची 94 लाख 5 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास कोथरुड पोलीस करीत आहेत.
Comments are closed.