Kothrud Assembly Election 2024 | कोथरूड विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी सामना; ठाकरे गटाकडून चंद्रकांत मोकाटे निवडणुकीच्या रिंगणात ! चंद्रकांत मोकाटे Vs चंद्रकांत पाटील (भाजप) Vs अ‍ॅड. किशोर शिंदे (मनसे) असा होणार सामना

October 28, 2024

पुणे: Kothrud Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघात आता तिरंगी निवडणूक पाहायला मिळणार आहे. कोथरुड विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. २०१९ चंद्रकांत पाटील या मतदार संघातून निवडून आले होते.

भाजपकडून (BJP) पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाने माजी आमदार असलेल्या चंद्रकांत मोकाटे (Chandrakant Mokate) यांना रिंगणात उतरवले आहे. तर मनसेकडून किशोर शिंदे (Adv Kirshor Shinde) आपली ताकद पणाला लावणार आहेत.

यावेळी चंद्रकांत पाटील यांना पक्षांतर्गत विरोधाचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते अमोल बालवडकर हे पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छूक होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचा सपाटा लावला होता. मात्र, भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवारीच्या यादीत चंद्रकांत पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.