Koregaon Park Pune Crime News | पुणे : जबरदस्तीने जागेचा ताबा घेऊन जागा मालकावर हल्ला, कोरेगाव पार्क परिसरातील घटना; 8 जणांवर FIR

July 8, 2024

पुणे : – Koregaon Park Pune Crime News | जागेचा जबरदस्तीने बेकायदा ताबा घेण्याचा प्रयत्न (Land Grabbing) करुन जागा मालकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार कोरेगाव पार्क येथील लेन नं. 7 मधील प्लॉट नंबर 405 याठिकाणी 3 जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दोन महिलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत नंदू अंतराम रजपूत (वय 59, रा. वारजे जकात नाका, वारजे) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय शिंदे, गौरव कवडे, राधाबाई कवडे, उदय कोटणीस, हेमा कोटणीस, पिंटू बापजी यांच्यासह आणखी दोन जणांवर भारतीय न्याय संहिता 329(3), 189(2), 189(3), 190, 191(1), 191(3), 115(2), 352, 324(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी नंदु राजपुत हे 3 जुलै रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास जावई निलेश बिरे, चालक तामशेटे यांच्यासह कोरेगाव पार्क येथील लेन नं.7 मधील फायनल प्लॉट नंबर 405, सिटीएस 192 येथे गेले होते. त्यावेळी आरोपींनी मोकळ्या जागेत तंबू उभारलेला दिसला. त्याठिकाणी आरोपी सिगारेट पीत बसले होते. फिर्यादी यांनी ही जागा माझी आहे,येथे बसू नका असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपी अजय शिंदे याने तुझा काय संबंध, ही जागा आमची आहे, असे म्हणत शिवीगाळ करुन कानशिलात लगावली. तसेच फिर्य़ादी यांचे जावई निलेश बिरे यांना धक्काबुक्की केली.

तसेच इतर आरोपींनी हातात लाकडी बांबू व लोखंडी रॉड घेऊन फिर्यादी यांच्या अंगावर धाऊन आले. या जागेचा व तुमचा काही एक संबंध नाही असे म्हणून शिवीगाळ करुन तिथून हकलून दिले. हा सर्व प्रकार घडत असताना त्याठिकाणी जमलेल्या नागरिकांना आरोपींनी धमकावून तुमचा काय संबंध निघा येथून असे म्हणून दहशत पसरवली. फिर्यादी तिथून जात असताना आरोपी अजय शिंदे याने दगड उचलून कारच्या पुढील काचेवर मारुन काच फोडून नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे चेतन मोरे करीत आहेत.