Koregaon Park Pune Crime News | दारुच्या नशेत एसीपीच्या गाडीला धडक देऊन पोलिसांशी घातली हुज्जत; दारुड्या चालकावर गुन्हा दाखल

October 29, 2024

पुणे : Koregaon Park Pune Crime News | भर दुपारी दारुच्या नशेत भरधाव गाडी चालवून सहायक पोलीस आयुक्तांच्या (ACP) शासकीय गाडीला धडक देऊन उलट त्यांच्या पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी (Koregaon Park Police) प्रफुल्ल भरत वाडे Prafulla Bharat Wade (वय ३२, रा. मित्तल सोसायटी, विश्रांतवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अंमलदार मनोजकुमार सोने यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कोरेगाव पार्कमधील हॉटेल चंद्रमा समोरील महात्मा गांधी चौकात सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने या वाहनचालक आर ए वाडेकर हे शासकीय वाहनाने कामानिमित्त येरवडा क्षेत्रीय कार्यालयात गेले होते. तेथून ते औंध येथील शहर कार्यालयात जात होते. कोरेगाव पार्क येथील हॉटेल चंद्रमा समोरील चौकात आरोपीने दारुच्या नशेत विना परवाना वाहन भरधाव चालवून शासकीय गाडीच्या पाठीमागील बंपरला ठोकर देऊन गाडीचे नुकसान केले. त्यानंतर फिर्यादी यांच्याशी हुज्जत घातली. सहायक फौजदार आव्हाळे तपास करीत आहेत.