Kondhwa Pune Crime News | कोंढवा: घरात घुसून अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, फोटो व्हायरल करण्याची धमकी; तरुणाला अटक
पुणे : – Kondhwa Pune Crime News | रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणी व महिलांच्या छेडछाडीच्या घटना वारंवार घडत असताना घरात देखील मुली सुरक्षीत नाहीत. एका 23 वर्षाच्या तरुणाने 13 वर्षाची अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन जबरदस्तीने घरात घुसला. तिच्यासोबत असभ्य वर्तन करुन मोबाईल मध्ये फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
याबाबत 13 वर्षाच्या पिडीत मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन रोहित शिवाजी देवके Rohit Shivaji Devke (वय-23 रा. लक्ष्मी पार्क, महमदवाडी) याच्यावर आयपीसी 354(अ), 354(ड), 506 पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार डिसेंबर 2023 ते 15 जून 2024 या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीचे आई-वडील कमाला गेले असताना ती घरात एकटीच होती. याचा गैरफायदा घेऊन आरोपी जबरदस्तीने घरात घुसला. त्याने मुलीला जवळ ओढून अश्लील वर्तन केले. तसेच त्याच्या मोबाईलमध्ये दोघांचे फोटो काढून विनयभंग केला. त्यानंतर मुलीचा वारंवार पाठलाग केला. याबाबत पिडीत मुलीच्या वडिलांनी त्याला समजावून सांगितले. मात्र, त्याच्यात काहीच फरक पडला नाही. त्याने वारंवार मुलीचा पाठलाग केला.
पिडीत मुलगी शिलाई मशीनच्या क्लासला गेल्यानंतर क्लासच्या बाहेर तिला आडवले. माझे तुझ्यावर प्रेम आहे, तु माझ्यबरोबर लग्न कर, नाही केले तर मी तुझ्या आई-वडीलांना मारुन टाकेन. तसेच मोबाईलमध्ये काढलेले फोटो व्हायरल करुन बदनामी करेन. तुझे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी देऊन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.
Comments are closed.