Kondhwa Pune Crime News | कोंढवा 1 कोटी 16 लाखांच्या फसवणूक प्रकारणी TikTok मैलाना उर्फ अब्दुल रशीद ऊर्फ मिफताही कलंदर खान सह 4 जणांवर MPID कायद्याखाली गुन्हा दाखल

July 31, 2024

पुणे : Kondhwa Pune Crime News | साद मोटर्स (Saad Motors Mitha Nagar) या गाड्या खरेदी विक्रीच्या व्यवसायात गुंतवणुक केल्यास महिना २ ते ३ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून ९ जणांची तब्बल १ कोटी १६ लाख रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत निसार बाबुलाल शेख (वय ५५, रा. चिंतामणीनगर, हडपसर) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रफिक कलंदर खान Rafiq Qalandar Khan (वय ४४), सनोबर ऊर्फ सौदा रफिक खान Sanobar alias Sauda Rafiq Khan (वय ४०), इसा रफिक खान Isa Rafiq Khan (वय २३), TikTok मैलाना उर्फ अब्दुल रशीद ऊर्फ मिफताही कलंदर खान Abdul Rasheed Alias Miftahi Qalandar Khan (वय ४८, सर्व रा. भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२० पासून आजपर्यंत घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिठानगर येथे साद मोटर्स नावाचे कार्यालय आहे. आरोपींनी फिर्यादी यांना साद मोटर्स नावाच्या गाड्यांचे खरेदी विक्री व्यवसायात पैसे गुंतविल्यास दर महा २ ते ३ टक्के परतावा देतो, असे आमिष दाखविले. त्यानुसार फिर्यादी व अनिकेत गायकवाड, हमीद बाबुलाल शेख, जुलेखा समीर शेख, अझीम राजूभाई मुलानी, संदीप बधे, जहांगीर पठाण, विशाल चव्हाण, समीर रज्जाक शेख यांनी तब्बल १ कोटी १६ लाख ९३ हजार ५०० रुपयांची गुंतवणुक केली. त्यानंतर गेल्या चार वर्षात आरोपींनी व्याज तसेच मुद्दलही परत दिली नाही. शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. पोलिसांनी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिसंबंधाचे संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.