कोलकाता : वृत्तसंस्था – गणराज्य दिनाच्या संचलनात इतिहासात प्रथमच कोलकाता पोर्ट ट्रस्ट (केओपीटी) चा चित्ररथ सादर केला जाऊ शकतो. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय जहाज मंत्रालयाच्यावतीने केपीटी या चित्ररथात समृद्ध इतिहास, बंदराचे अधुनिक स्वरूप, अशी वैशिष्ट्ये प्रदर्शित करणार आहे. केंद्र सरकारने यापूर्वी पश्चिम बंगालच्या चित्ररथाला परवानगी नाकारली होती, आता केपीटीचा चित्ररथाच्या वृत्तामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
जेव्हा चित्ररथ राजपथावरून जाईल तेव्हा कोलकाता पोर्ट ट्रस्टचे ते गीतही वाजवले जाईल ज्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मागील आठवड्यात केपीटीच्या 150 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात लाँच केले होते. सूत्रांनी सांगितले की, सध्या याबाबत चाचणी घेतली जात आहे. हा विषय ग्लोरियस पास्ट वायब्रेंट फ्यूचर कडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे, ज्यावर 23 जानेवारीपर्यंत निर्णय येण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांनी आपल्या कोलकाता दौर्यात केपीटीचे नाव बदलून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जीचे यांचे नाव दिले होते. पीएम मोदी यांनी केपीटीचा समृद्ध इतिहास ताजा करताना म्हटले होते की, कोलकाता पोर्ट ट्रस्ट हे केवळ जहाजांच्या येण्या-जाण्याचे ठिकाण नाही, तर यामध्ये इतिहास समाविष्ट झाला आहे. याने देशाला स्वातंत्र्य मिळताना, सत्याग्रह आणि देश बदलताना पाहिले आहे.
विशेष म्हणजे पश्चिम बंगालच्या चित्ररथाला यावर्षी सहभाग घेण्याची परवानगी देण्यात येणार नाही, असे केंद्र सरकारने म्हटले होते. संरक्षण मंत्रलायाने सांगितले की, बंगाल सरकारचा चित्ररथाचा प्रस्ताव तज्ज्ञ समितीकडे दोन वेळा पाठवण्यात आला. दुसर्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा करून तो रद्द करण्यात आला. यावर तृणमूल काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत यास बंगालचा अपमान असे म्हटले होते. आता केपीटीच्या चित्ररथास परवानगी मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामध्ये पश्चिम बंगाल सरकारचा सहभाग असणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
Visit : bahujannama.com