कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – बेहिशेबी मालमत्ता संपादित केल्याप्रकरणी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकासह त्यांच्या पत्नी व मुलावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि.3) गुन्हा दाखल केला आहे. सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक जेडी उर्फ जनार्दन दगडू जाधव (वय-62) त्यांची पत्नी जयश्री जाधव (वय-54), मुलगा प्रसाद जाधव (सर्व रा. प्लॉट नं. 31, गुरुकृपा बंगला, न्यू पॅलेस, छत्रपती पार्क, रमणमळा, कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
आजरा पोलीस ठाण्यात कार्यरत असताना दि. 31 ऑक्टोबर 2001 ते 25 एप्रिल 2017 या परीक्षण कालावधीत 30 लाख 56 हजार 426 एवढी उत्पन्न स्त्रोतांपेक्षा अधिक अशी बेहिशेबी मालमत्ता चौकशीत आढळून आली. कुटुंबीयांनी संशयित आरोपीला सहाय्य केले म्हणून त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिंबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत हे चौकशी अधिकारी आहेत. तर पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत तपास अधिकारी आहेत.
कृपया हे देखील वाचा:
कल्याणमध्ये खळबळ ! घरात आढळली शेकडो कोरी मतदान ओळखपत्र
‘झायडस कॅडिला’च्या ‘अँटिबॉडी कॉकटेल’ला वैद्यकीय चाचणीची परवानगी
पुण्यातील ससून रूग्णालयामध्ये म्युकोरमायकॉसिसच्या 100 शस्त्रक्रिया
आता एकाचवेळी 4 फोन्समध्ये वापरता येईल WhatsApp, कंपनीकडून Multi Device Support ची घोषणा
‘ताकतच पहायची असेल तर…’ राणेंच्या टीकेनंतर खा. संभाजीराजेंचं सूचक ट्वीट