कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – Kolhapur News | कोल्हापूर – राधानगरी रोडवरील (Kolhapur – Radhanagari Road) पिरवाडी जवळ एका वळणावर शितपेय घेऊन जाणारा ट्रक उलटला. या अपघातात (Accident) ट्रकमधील दोघे गंभीर जखमी झाले. मात्र ट्रक उलटल्याचे पाहून परिसरातील ग्रामस्थांनी मदत करण्याऐवजी ट्रकमधील शितपेयावर डल्ला मारण्यास सुरुवात केली. ट्रकमधील शितपेयांचे बॉक्स (Cold Drink Box) नेण्यासाठी परिसरातील लोकांची तसेच रस्त्यावरुन जाणार्या येणार्या वाहनचालकांची झुंबड उडाली होती. (Kolhapur News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गोव्याहून कोल्हापूरकडे शितपेय घेऊन जाणारा ट्रक करवीर तालुक्यातील पिरवाडी जवळ शनिवारी पहाटे एका वळणावर उलटला. या अपघातात ट्रकमधील चालक व क्लिनर हे दोघे गंभीर जखमी झाले.
त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, उलटलेला ट्रक रस्त्याच्या कडेला होता.
तेथे कोणी नसल्याचे पाहून परिसरातील लोकांनी गर्दी केली.
उलटलेल्या ट्रकच्या खालच्या बाजूला जाऊन लोक आतील शितपेयांचे मोठे मोठे बॉक्स बाहेर काढू लागले. (Kolhapur News)
एका दोघांनी सुरुवात केल्यावर शितपेयांचे बॉक्स पळून देण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली.
अनेकांनी गाड्या घेऊन येऊन त्यात शितपेयांचे बॉक्स भरुन घेऊन गेले.
दुचाकीस्वारांनी मधल्या जागेत मोठे बॉक्स ठेवून घेऊन जाताना दिसून येत होते.
संपूर्ण रस्त्यावर शीतपेयांच्या हिरव्या बाटल्या घेऊन जाणारे लोक दिसत होते.
काही वेळातच संपूर्ण ट्रक जवळपास पूर्ण ट्रक लोकांनी लुटून नेला. त्यांना अडवायला अथवा बोलायला कोणी नव्हते.
अनेक श्रीमंतही आपल्या कारमध्ये बॉक्सचे बॉक्स घेऊन जाताना दिसून आले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Kolhapur News | The truck overturned and there was a crowd of villagers; Not to ‘help’ but to ‘robbery’
हे देखील वाचा :
Nagpur Crime News | नागपूरमध्ये तलवार गॅंगची दहशत; भर बाजारात केली तोडफोड
Pune Crime News | पुण्यात भीषण अपघातात आई-मुलाचा मृत्यू, महिलेचं सरपंच होण्याचं स्वप्न राहिलं अधुरं