कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – Kolhapur Crime | कोल्हापूर जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना (Kolhapur Crime) उघडकीस आली आहे. एका 7 वर्षाच्या मुलाची हत्या (Murder) करण्यात आली आहे. त्या निष्पाप मुलाचं अपहरण केल्यानंतर हत्या करुन मृतदेह घराच्या मागे फेकून देण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे त्या मृतदेहावर हळद कुंकू लावून टाकण्यात आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय उपस्थित होतो आहे. या घटनेमुळे कोल्हापूर शहर हादरलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत माहिती अशी, ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) शाहूवाडी तालुक्यातील कापशी येथे घडली. आरव केशव केशरे (Arav Keshav Kesare) (वय,7) असं त्या मुलाचं नाव आहे. आरव या चिमुरड्याचं गेल्या दोन दिवसापुर्वी अपहरण (Kidnapping) झालं होतं. यानंतर त्याचा शोध घेण्याचे काम सुरु होते. मात्र, आज (मंगळवारी) पहाटेच्या सुमारास आरवचा मृतदेह घराच्या मागे आढळून आला. धक्कादायक बाब म्हणजे हळद कुंकू लावून आरवचा मृतदेह फेकून दिला होता. या घटनेमुळे शहरात खळबल उडाली आहे.
Web Title :- Kolhapur Crime | Kolhapur trembled! Murder of 7 year old boy? a dead body of seven year old found; The corpse was thrown with turmeric kumkum, suspected of human sacrifice?
Pune Crime | ‘आज पंगा नाही घ्यायचा, नाहीतर विकेट’, तडीपार गुंडाकडून पोलिसांना जिवे मारण्याची धमकी