• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Kolhapur Crime | दुर्देवी ! नरबळीची चर्चा पण 48 तासात ‘पर्दाफाश’; 6 वर्षाच्या बालकाशी जन्मदात्यानं केलं भयंकर ‘कृत्य’; जाणून घ्या प्रकरण

by Sikandar Shaikh
October 7, 2021
in कोल्हापूर, क्राईम, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
Kolhapur Crime | kolhapur father killed 6 year old son arav in moment of anger kolhapur police done good job

file photo

कोल्हापूर :  बहुजननामा ऑनलाईन  –  Kolhapur Crime | शाहूवाडी (shahuwadi) तालुक्यातील वारणा कापशी येथील आरव केसरे या बालकाच्या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. तपासात चहासाठी जन्मदात्या पित्यानेच आरवची हत्या केल्याचे निषपन्न झाले आहे. राकेश रंगराव केसरे (वय २७, रा. कापशी, ता. शाहूवाडी) असे खुनी बापाचे नाव (Kolhapur Crime) आहे.

याबाबत पोलिसांनी (Kolhapur Police) दिलेली माहिती अशी की, रविवारी सायंकाळी राकेशला हॉटेलवर कामाला जायचे होते. तत्पूर्वी त्याला चहा हवा होता. घराबाहेर गेलेली पत्नी साधनाला बोलावून आणण्यास आरवला (वय – 6) सांगितले मात्र त्याने त्यास नकार दिला. त्यामुळे राकेशचा पारा चढला. त्याने आरवला आधी भिंतीवर आपटून, नंतर आरवच्या छातीवर जोराचा ठोसा मारला. यात आरव बेशुद्ध पडला. त्यानंतर भीतीपोटी राकेशने भीतीपोटी आरवचा गळा दाबून खून केला आणि लगबगीने घरामागील पडक्या खोलीत मृतदेह दडवून ठेवला. त्यानंतर आरव बेपत्ता झाल्याचा बनाव केला. तशी तक्रार ही पोलिसात दिली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांना आरवचा मृतदेह घराजवळच्या बोळात आढळून आला. त्यावर हळद कुंकू टाकल्याचेही निदर्शनास आले. नरबळीच्या शक्यतेने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.

मात्र दरम्यान, शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्यामुळे आरवचा श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी वजनदार वस्तूचा घाव बसून छातीच्या दोन बरगड्या तुटलेल्या आढळून आल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा पुन्हा बदलली.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

दिवसभराच्या तपासानंतर ही बालकाच्या हत्येचे गूढ कायम होते. त्यानंतर नातलगांसह जवळपास १२ ते १५ जणांची कसून चौकशी केली. यामध्ये महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. माहितीतील विसंगतीमुळे हा तपास ठोस निष्कर्षाप्रत पोहोचला नसल्याचे सांगत यंत्रणेने कमालीची गोपनीयता बाळगली होती. मात्र, बालकाच्या हत्येमागील सूत्रधार म्हणून जवळच्या नातलगांवरच संशयाची सुई स्थिरावल्याचे स्पष्ट संकेत मिळत होते. पोलिसांनी बुधवारी सायंकाळी राकेशला चौकशीच्या बहाण्याने बोलावून घेत ताब्यात घेण्यात आले. त्याचवेळी त्याची पत्नी साधना, सासू, सासरा तसेच अविवाहित मेव्हणी यांना बांबवडे पोलिस दूरक्षेत्रात हलविले आणि तत्काळ राकेश याला बोलते करत पोलिसांनी त्याच्याकडून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. रागाच्या भरात केलेल्या मारहाणीत बेशुद्ध पडलेल्या आरवचा राकेशने भीतीपोटी गळा आवळून जीव घेतल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. पत्नी साधना हिचाही काटा काढण्याचा राकेशने कट रचला होता. मात्र आरव बेपत्ता झाल्यापासून घरात पाहुणे, नातलगांची वर्दळ असल्याने त्याचा तो कट फसला.

महत्त्वाचे म्हणजे पत्नीची हत्या करून तो स्वतः पोलिसात हजर होणार होता अशा कबुलीही राकेशने पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध भा. दं. वि. च्या कलम 302, 201 अन्वये हत्या व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान तपासात दिरंगाई होत असल्याच्या कारणावरून कापशी गावात बुधवारी दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. जमाव गोळा करून जलदगतीने तपास (Kolhapur Crime) करून संशयितांना जेरबंद करण्याच्या मागणी
करू पाहणाऱ्यांना डीवायएसपी साळुंखे आणि पोलीस निरीक्षक विजय पाटील (Police Inspector Vijay Patil) यांनी संयम बाळगण्याचे केलेले आवाहन सफल ठरले.
तपासात अनेकांकडे चौकशी करण्यात आली. त्यामुळे दिवसभर अफवांचे पीक उठत राहिले.

 

पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे (SP shailesh balkawade) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा तपास सुरू होता. अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे (addl sp tirupati kakde) यांनी कापशी गावात दिवसभर तळ ठोकला होता. आरवच्या अंगावर हळद कुंकू आढळल्याने पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास केला. त्यासाठी गावातील देवऋषी तसेच गंडेदोर्‍यांशी निगडित घटकांना चौकशीसाठी दोन ते तीनवेळा पाचारण केल्याने घटनेतील संभ्रम वाढला होता.

दुसर्‍या बाजूला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांसह काही पुरोगामी विचारांच्या
संघटनांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच महसूल प्रशासनाला निवेदन सादर करून गुन्ह्याची उकल करण्याचा तगादा लावला होता.
अखेर पोलिसांना या खुनाचा उलगडा करण्यात यश मिळाले.
राकेशनेच आपले कृत्य लपवण्यासाठी नरबळी वाटण्यासाठी मृतदेहावर हळद कुंकू टाकल्याची कबुली दिली आहे. कोल्हापूर पोलिसांनी 48 तासात प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.

Web Title :- Kolhapur Crime | kolhapur father killed 6 year old son arav in moment of anger kolhapur police done good job.

 

Pune News | नवरात्री उत्सवाच्या मुहूर्तावर आजपासून धावणार हडपसर-मोरगाव पीएमटी

Accident News | उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथे बस-ट्रकची समोरासमोर धडक; 8 जणांचा जागीच मृत्यू

Pune Crime | 10 लाखाच्या खंडणीचं प्रकरण : राजेश बजाज, बापू शिंदे यांच्यावर आणखी एक खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल

Tata Group | रतन टाटा यांच्या टायटनची बाजारात ‘धूम’, TCS नंतर ‘हा’ टप्पा गाठणारी बनली दुसरी कंपनी

Tags: 6 year old child deathArav is unconsciousarrestedAutopsy ReportBloody fatherbreakingCarcassesDeath by suffocationDisappearedDYSP SalunkheFather in lawguestsheavy object woundInspector of Police Vijay Patillatest marathi newsMother in lawMurder by strangulationmystery of the murder of a childPolice arrestedRelativessadhanaShahuwadiSP shailesh balkawadeTeaTurmeric kumkumunmarried sister-in-lawUpper Superintendent of Police Tirupati Kakadewifeworked at the hotelअप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडेआरवआरव केसरेखुनी बापगळा दाबून खूनचहाडीवायएसपी साळुंखेदेवऋषीनरबळीपोलिस अधीक्षक शैलेश बलकवडेपोलीस निरीक्षक विजय पाटीलबेपत्ताबेशुद्धवारणा कापशीशवविच्छेदन अहवालशाहूवाडीहळद कुंकू
Previous Post

Pune News | नवरात्री उत्सवाच्या मुहूर्तावर आजपासून धावणार हडपसर-मोरगाव पीएमटी

Next Post

Navratri Utsav 2021 | नवरात्री उत्सवानिमित्त PM नरेंद्र मोदींच्या देशवासियांना शुभेच्छा !

Next Post
Navratri Utsav 2021 | pm modi wishes may navratri Jagat Janani Maa be bringer strength good health and prosperity everyone lives.

Navratri Utsav 2021 | नवरात्री उत्सवानिमित्त PM नरेंद्र मोदींच्या देशवासियांना शुभेच्छा !

Diabetes Joint Pain | diabetes joint pain due to increase in blood sugar joint pain occurs can be relieved by these methods
आरोग्य

Diabetes Joint Pain | ब्लड शुगर वाढल्याने का होते सांधेदुखी? ‘या’ पद्धतींनी होऊ शकते सुटका; जाणून घ्या

May 16, 2022
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - Diabetes Joint Pain | बदलती जीवनशैली आणि कामात व्यस्त असलेल्या लोकांना अनेक किरकोळ समस्या येतात. परंतु...

Read more
CNG Price Hike | cng price hiked by rs 2 per kg in delhi ncr know rate in mumbai pune nagpur and other city

CNG Price Hike | सीएनजी गॅसच्या दरात 2 रुपयांची वाढ; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूरसह देशातील प्रमूख शहरातील दर

May 16, 2022
Pune Crime | Shocking The father was showing the girl a pornographic video Lingerie photos and videos taken by sister FIR on mother father sister

Pune Crime | धक्कादायक ! वडिलच मुलीला दाखवत होते पोर्नोग्राफी व्हिडिओ; बहिणीने काढले अंतवस्त्रातील फोटो व व्हिडिओ, आई वडिल, बहिणीवर FIR

May 16, 2022
Pune Pimpri Crime | demand for rs 11 crore ransom from builder of pimpri chinchwad of pune

Pune Pimpri Crime | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडे 11 कोटीची खंडणीची मागणी

May 16, 2022
Migraine Pain | 5 ways you can get rid of migraine pain

Migraine Pain | कडक उन्हाळ्यात मायग्रेनच्या त्रासाने असाल त्रस्त तर करा ‘हे’ खास उपाय, लवकर मिळेल आराम; जाणून घ्या

May 16, 2022
High Court | chhattisgarh high court observed wife wife constraining husband to get separated from parents is cruelty

High Court | ‘पतीला पालकांपासून विभक्त करणं ही पत्नीची क्रुरता’ – उच्च न्यायालय

May 16, 2022
PMPML E-Bus | PMPML's e-bus service at Sinhagad suspended temporarily from May 17

PMPML E-Bus | ‘पीएमपीएमएल’ची सिंहगडावरील ई-बस सेवा 17 मे पासून तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित

May 16, 2022
Worst Foods For Metabolism | weight loss diet worst foods for your metabolism avoid eating these things for thin waist

Worst Foods For Metabolism | कधीही कमी होणार नाही तुमचे वजन, जर खात रहाल ‘या’ 5 गोष्टी, जाणून घ्या

May 16, 2022
Health Benefits Of Raw Mango | benefits of raw mango for diabetes patients to control blood sugar level

Health Benefits Of Raw Mango | शुगर पेशेंटसाठी खूप लाभदायक आहे कैरी, इम्युनिटी सुद्धा वाढवते; जाणून घ्या तिचे फायदे

May 16, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Kolhapur Crime | kolhapur father killed 6 year old son arav in moment of anger kolhapur police done good job
कोल्हापूर

Kolhapur Crime | दुर्देवी ! नरबळीची चर्चा पण 48 तासात ‘पर्दाफाश’; 6 वर्षाच्या बालकाशी जन्मदात्यानं केलं भयंकर ‘कृत्य’; जाणून घ्या प्रकरण

October 7, 2021
0

...

Read more

What Are The Causes Of Less Blood | ‘या’ गोष्टींचं सेवन केल्यास दूर होते रक्ताची कमतरता, मोठ्या प्रमाणात महिलांमध्ये दिसते ‘ही’ समस्या, जाणून घ्या

3 days ago

Summer Health Tips | जाणून घ्या उन्हाळ्यात नाकातून रक्तस्त्राव होण्याची कारणे, परिणाम आणि प्रतिबंध उपाय

2 days ago

Driving License New Rules | केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स नियमात केला ‘हा’ बदल; जाणून घ्या सविस्तर

5 days ago

Beed Dhamangaon Ghat Accident | दुर्देवी ! पुण्याहून बीडकडे जाताना कारचा भीषण अपघात; प्रसिध्द व्यापारी टेकवाणी कुटुंबातील चौघांचा मृत्यू

4 days ago

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलिशियस् संघाने उद्घाटनाचा दिवस गाजवला !

6 days ago

Ajit Pawar | ‘केतकी चितळेला चांगल्या मनोरूग्णालयात दाखविण्याची गरज’ – अजित पवार

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat