बहुजननामा ऑनलाईन टीम – बिग बॉस १३ मध्ये सहभागी असलेली अभिनेत्री कोएना मित्रा सोशल मीडियावरील तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असते. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा एकदा तिने ट्विट करत एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर निशाणा साधला आहे. ओवेसी यांनी एक वादग्रस्त ट्विट केले होते आणि एक लेख शेअर करताना लिहिले होते की, ‘मला माझी मशिद परत पाहिजे आहे.’ ओवेसीचे ट्विट शेअर करताना कोएनाने लिहिले की ‘मला आमची ४० हजार मंदिरे परत हव्या आहेत.’ #IdiotOwaisi
दरम्यान, राम जन्मभूमी वादावरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत ओवेसी यांचे हे ट्विट केले गेले होते. सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालामध्ये रामल्ला यांना वादग्रस्त जागेचा खरा मालक म्हणून मान्यता दिली आहे. त्याचबरोबर मशिदीसाठी ५ एकर जमीन स्वतंत्रपणे देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान,ओवेसी यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली असून तो या निर्णयाविरोधात सतत निषेध करत आहे.
बिग बॉसमध्ये कोएनाचा प्रवास :
कोएनाचा बिग बॉसमधील प्रवास काही काळापूर्वी संपला होता. कोएनाला लोकांनी चांगलीच पसंती दर्शविली आणि कोएना घराबाहेर पडल्याने तिच्या चाहत्यांनी ट्विटरवर प्रचंड रोष व्यक्त व्यक्त केला. कोएनाचे चाहते म्हणतात की, तिने घरात कोणाच्याही मागे गुगली केलेली नाही. ट्विटरवर लोक म्हणाले की, सलमान खान कोएनाला जबरदस्तीने चुकीचे ठरवत होते कारण ती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सत्य बोलते. घरात कोएना मित्रा आणि शहनाज गिल यांची भांडण प्रत्येकानी पहिली आहेत. पण सलमानने कोएनाचे नाव जाहीर करताच या दोघांनीही वाद विसरून एकमेकांना मिठी मारली होती.