नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या या काळात जनधन खात्यांत वाढ झाली आहे. या काळात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडू नये, यासाठी सरकार आणि बँका ग्राहकांना सुविधा पुरवत आहे. तुम्ही आता घरबसल्या तुमच्या जनधन खात्यात किती पैसे आहेत, याची माहिती करून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला बँकेत किंवा एटीएममध्ये जाण्याची गरज नाही. जनधन खात्यातील बॅलन्सची माहिती तुम्ही दोन प्रकारे मिळवू शकता. पहिला आहे PFMS पोर्टल आणि दुसरे म्हणजे मिस्ड कॉलच्या माध्यमातून माहिती घेता येईल.
1) PFMS पोर्टल
पीएफएमएस पोर्टलवरून माहिती मिळवायची असल्यास तुम्हाला या https://pfms.nic.in/
2. Missed calls
तुमचे जनधन खात जर एसबीआय बॅंकेत असेल तर तुम्ही मिस्ड कॉलच्या माध्यमातून खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला 1800425380 या अथवा 1800112211 या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल. यासाठी तुम्हाला बँकेत रजिस्टर्ड मोबाईल नंबरचा वापर करावा लागेल.
जनधन खाते कसे उघडणार जाणून घ्या ?
प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब लोकांचे खाते झिरो बॅलेन्सवर बँक, टपाल कार्यालये आणि राष्ट्रीयीकृत बँकेत उघडले जाते. तुम्हाला देखील जनधन अकाउंट उघडायचे असेल तर जवळच्या बँकेत जा. त्याठिकाणी जनधन अकाऊंटचा फॉर्म भरा. तिथे तुमची आवश्यक सर्व माहिती द्या. अर्ज करणाऱ्या व्यक्तीला नाव, मोबाईल नंबर, बँकेच्या शाखेचे नाव. पत्ता, वारसदार, व्यवसाय / रोजगार, वार्षिक उत्पन्न, घरातील सदस्य संख्या, एसएसए कोड किंवा वार्ड नंबर, व्हिलेज कोड आदीची माहिती द्यावी लागेल. PMJDY च्या वेबसाईटवरील माहितीनुसार, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड नंबर, मतदान कार्ड, राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेले मनरेगा जॉब कार्डच्या आधारे तुम्ही तुमचे जनधन अकाऊंट उघडता येते.