नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अॅप डेव्हलपरने (App developer) एक अॅप तयार केलं आहे. त्या तयार केलेल्या अॅपमधून आता आपलया अनुपस्थितीत कोणीही आपला स्मार्टफोन अनलॉक करत असेल तर तो कोण करत आहे हे जाणून घेता येऊ शकणार आहे. फोनचा मालक तिथे उपस्थित नसताना जर कोणी व्यक्ती अशा पद्धतीने त्याच्या फोनचा पासवर्ड काढण्याचा प्रयत्न करत असेल तर तो कोण करत आहे याची माहिती मिळणार आहे.
अॅप डेव्हलपरने केलेल्या त्या अॅपचे नाव Who touched my phone असे आहे. Midnightdev याने या अॅपला बनवलं आहे. हे अॅप इन्स्टॉल केल्यानंतर याला काही परवानगी द्यावी लागते. तर हे अॅप प्ले-स्टोअरवरून डाउनलोड करता येऊ शकते. प्ले-स्टोअरवर अॅपला ४.८ रेटिंग मिळाले आहे. या अॅपसाठी १.१८ लाख लोकांनी पुनरावलोकनही प्रयत्न करणार अशील,. Who touched my phone हे अॅप वापरणंही अतिशय अगदी सोपं आणि सुलभ आहे. तसेच हे अॅप फ्री आहे,
दरम्यान, कोणीजर तुम्ही नसताना फोन अनलॉक करण्याचा प्रयत्न करेल, त्याबाबत लगेच अॅपद्वारे याचा रिपोर्ट (अहवाल) युजरला मिळेल. तसेच, यावरून आता या सुविधाचे पार करण्यासाठी या अॅपला फ्रंट कॅमेराचा अॅक्सेस द्यावा लागणार आहे. ज्यांनी फोन अनलॉक करण्याचा प्रयत्न केलाय, तेव्हा त्या अहवालामध्ये युजरला त्या व्यक्तीचा फोटो स्पष्ट दिसणार आहे. तर हे अॅप रिपोर्ट सेव्ह करतं. जर एखाद्याने फोन अनलॉक केला, तर त्याने कोणतं अॅप ओपन केलं, याबाबतही माहिती मिळेल. अनलॉक करण्यासाठी किती वेळा प्रयत्न केले गेले, तसंच कोणते पॅटर्न ड्रॉ करण्यात आले अशी संपूर्ण माहिती या अॅपच्या माध्यमातून मिळणार आहे. हे अॅप Google Play Store वरुन डाउनलोड करता येणार आहे. तसेच, या अॅपमध्ये २ फीचर्स आहेत. बेसिक फीचर्स हे फ्री आहे. तर प्रीमियम फीचर्स अॅक्सेससाठी पैसे द्यावे लागणार आहे.