नवी दिल्ली : मोदी सरकारच्या अनेक प्रकारच्या सरकारी योजना आहेत, ज्यांचा लाभ अनेक लोक घेत आहेत. अशाच प्रकारची एक योजना मुलींसाठी आहे जिचे नाव पंतप्रधान कन्या सन्मान योजना आहे. असे म्हटले जात आहे की, या योजनेंतर्गत सरकार मुलींच्या खात्यात 2500 रुपये रक्कम जमा करत आहे. याची पूर्ण हकीकत जाणून घेवूयात.
सोशल मीडियावर केला जातोय दावा
सोशल मीडियावर सध्या सरकारच्या योजनांबाबत विविध प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. सरकारी योजनांच्या आडून काही लोक अशा योजनांच्या नावाखाली लोकांच्या पर्सनल डिटेल्स घेऊन पैसे हडपण्याचे काम करत आहेत. पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये हा दावा पूर्णपणे चुकीचा सांगितला आहे. पीआयबी फॅक्ट चेकनुसार सरकारकडून असा कोणताही दावा करण्यात आलेला नाही.
पीआयबीने केले अलर्ट
पीआयबीने आपल्या ट्विटर अकाऊंट फॅक्ट चेकद्वारे लोकांना अलर्ट केले आहे की, अशाप्रकारे कोणत्याही योजनेसाठी पर्सनल माहिती देऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. यासाठी कोणत्याही सरकारी योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल, अगोदर त्याच्या वेबसाइटवर जाऊन पूर्ण माहिती तपासा.
दावा: एक #YouTube वीडियो में यह दावा किया जा रहा है कि केंद्र सरकार सभी बेटियों के बैंक खातों में 'कन्या सम्मान योजना' के तहत प्रति माह 2,500 रूपए की राशि जमा कर रही है। #PIBFactCheck: यह दावा फर्जी है। केंद्र सरकार द्वारा ऐसी कोई योजना नहीं चलाई जा रही है। pic.twitter.com/HIiPeyPuTW
— PIB Fact Check (@PIBFactCheck) November 16, 2020