नवी दिल्ली : वृत्तसंस्था – साधारणपणे प्रोविडेंट फंडातून पैसे काढण्यासाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर किंवा यूएएन आवश्यक असते. आपण आपल्या नियोक्ता कंपनीकडून सहजपणे यूएएन मिळवू शकता. परंतु अशा अनेक प्रकरणात पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी यूएएन नंबर उपलब्ध नसतो. अनेक वेळेस आपण काम करत असलेल्या कंपनीकडून हा नंबर मिळवण्यात आपण अयशस्वी ठरलेलो असतो. त्यामुळे पीएफ ( provident fund account ) खात्यातून पैसे काढण्यासाठी आज आपण एक नवीन पद्धत जाणून घेऊयात.
सामान्यपणे पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी आपल्याकडे दोन पर्याय उपलब्ध असतात. एक म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरून जमा करू शकतो आणि दुसरा पर्याय म्हणजे यासाठी आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपल्याकडे सुरु असलेला यूएएन नंबर हवा असतो. सोबतच आपले आधार, पॅन आणि बँक खाते लिंक असले पाहिजे. जर आपल्याकडे युनिव्हर्सल अकाउंट नंबर ( universal account number ) नसेल तर आपण ऑफलाईन अर्ज जमा करून पीएफ मधून पैसे काढू शकतो. त्यासाठी आपल्याला आधार बेस्ड कम्पोजिट क्लेम फॉर्म किंवा मग नॉन-आधार कम्पोजिट क्लेम फॉर्म डाउनलोड करावे लागेल.
हा फॉर्म विभागीय ऑफिसला जमा करावा लागतो
डाउनलोड केलेला आधार बेस्ड कम्पोजिट क्लेम फॉर्म भरून विभागीय पीएफ ऑफिस मध्ये जमा करू शकतो. यामध्ये आपल्याला आपल्या नियुक्त असलेल्या कंपनीकडून प्रमाणित केले जाण्याची गरज नाही.
नॉन-आधार कम्पोजिट फॉर्म प्रमाणित करणे गरजेचे
जर आपण नॉन-आधार कम्पोजिट फॉर्म डाउनलोड केलेला असेल तर तो प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. फसवले जाण्यापासून वाचण्यासाठी पीएफ चे पैसे आपल्या खात्यातच जावे यासाठी आपल्याला पीएफ ऑफिस खात्यातून प्रमाणित करणे गरजेचे आहे. हा फॉर्म आपण एखाद्या गेझेटेड अधिकारी, बँक मॅनेजर मॅजिस्ट्रेट कडून प्रमाणित करून घेऊ शकतो. त्यानंतर हा फॉर्म आपल्या जवळच्या विभागीय कार्यालयात जमा करावा लागेल.
जाणून घ्या , पीएफ मधून किती पैसे काढता येतील
आपण आपल्या ईपीएफ खात्यातून सर्व पैसे काढू शकतो कि केवळ काहीच पैसे काढता येतात. ईपीएफ खात्यातून आपण तेव्हाच पूर्ण पैसे काढू शकतो जेव्हा तुम्ही रिटायर होत असता किंवा मग किमान दोन महिन्यांपासून नोकरी करत नसाल तर या खात्यातून पैसे काढता येतात. जर आपण एक महिन्यापासून नोकरी करत नसाल तर पीएफ रकमेच्या ७५ टक्के रक्कम काढू शकतो. अशा प्रकारे आपल्याला पीएफ मधून पैसे काढता येऊ शकतात.
Visit : bahujannama.com