मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – देशातील सर्वात मोठी कंपनी रियालान्स इंडस्ट्री लिमिटेड (आरआयएल) ने ग्राहकांना सर्वात मोठी भेट दिली आहे. आता आपण घरी बसून सेट टॉप बॉक्सच्या मदतीने व्हिडिओ कॉल करू शकता. यासाठी, सेट टॉप बॉक्स गीगा फायबर नेटवर्कशी कनेक्ट केला जाईल. कंपनी उपलब्ध करुन देत असलेली ही सुविधा म्हणजे डिजिटल युगातील एक क्रांती समजली जात आहे. या संबंधित माहिती देताना कंपनीने आपल्या एजीएममध्ये उपलब्ध करुन देत असलेल्या सुविधांची माहिती दिली आहे. सीएमडी मुकेश अंबानी यांनी कंपनीचे व्हिजन शायर करत सांगितले की, येत्या १ महिन्यांत आरआयएल कर्जमुक्त कंपनी होईल.
५ सप्टेंबरपासून सुरु होणार जिओ फायबर सर्विस –
जिओ फायबर सेवा ५ सप्टेंबरपासून ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात येईल. याचे प्लॅन १०० Mbps पासून सुरु होतील. हा स्पीड बेसिक प्लॅनसाठी असेल. प्लॅननुसार हा स्पीड १ Gbps जाईल. यात सर्व वाइस कॉल फ्री असणार आहे. जिओ फायबरचे प्लॅन ७०० रुपयांपासून सुरु होईल. अनलिमि़डेट इंटरनॅशनल कॉलिंगचा प्लॅन ५०० रुपयांपासून सुरु होईल.
जिओ हॉलोबोर्ड MR हेडसेट –
शॉपिंगसाठी रिलासन्सने एक विशेष ऑग्मेंटेज रिअॅलिटी डिवाइस MR हेडसेट सादर केला आहे. यामाध्यामतून तुम्ही गारमेंट ३६० डिग्रीमध्ये पाहू शकतात. यामुळे तुमची शॉपिंग सहज होऊन जाईल. या डिवाइसच्या माध्यमातून तुम्ही अभ्यासाचा नवा अनुभव घेऊ शकतात. यामाध्यमातून तुम्ही अंतराळ, चंद्रयानच्या माध्यमातून अभ्यास करु शकतात. यातून तुम्ही सिनेमा पाहण्याचा देखील चांगला अनुभव घेऊ शकतात. यातून तुम्हाला चित्रपटगृहात चित्रपट पाहिल्या सारखा अनुभव मिळेल.
स्टार्टअपसाठी घोषणा –
जिओ संपूर्ण देशात वर्ल्ड क्लास डेटा सेंटर स्थापित करणार आहे. स्टार्टअपसाठी जिओने मोठी घोषणा केली आहे. आता जिओ कनेक्टिविटी आणि क्लाऊड सेवा मोफत देणार आहे. ही सेवा स्टार्टअपला १ जानेवारी २०२० पासून मिळेल. जिओ त्या सर्व स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करेल, जे देशात डिजिटल क्रांती, मायक्रो अँड स्मॉल बिजनेस, कृषि उद्योग,ऑटोमेशन क्षेत्रात काम करतील. ज्याच्या काही खास कल्पना असतील आणि जे स्टार्टअप देशाला पुढे नेण्यासाठी सक्षम असतील.