नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमधील राजगडमध्ये भाजपचे कार्यकर्ते रविवारी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ निदर्शने करत होते. जिल्ह्यात कलम १४४ लागू असून पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना माघार घेण्यास सांगितले. त्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. दरम्यान मध्य प्रदेशमधील राजगडच्या उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा याही उपस्थित होत्या. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला असून एका निषेधकर्त्याने प्रिया वर्मा यांचे केस ओढले आहेत. तर वर्मा यांच्यावर निषेधकर्त्याला चापट मारल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्या सध्या चर्चेत आहेत.
#WATCH Madhya Pradesh: A protestor pulls hair of Rajgarh Deputy Collector Priya Verma, after she hits BJP workers and drags them. The clash broke out during a demonstration in support of #CAA. pic.twitter.com/7ckpZaFBkJ
— ANI (@ANI) January 19, 2020
यांनतर त्या ट्विटरवर ट्रेंड होत आहेत. राजगड जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा या मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील मांगलिया गावाच्या रहिवासी आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर प्रिया वर्मा यांनी नागरी सेवेची तयारी सुरु केली. वयाच्या २१ व्या वर्षी डीएसपी झालेल्या प्रिया वर्मा यांनी प्रथम २०१४ साली मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि राज्यातील भैरवगड जिल्ह्यात जेलर म्हणून त्यांची पहिली पोस्टिंग झाली. यानंतर केवळ सहा महिन्यांनंतर २०१५ मध्ये त्यांना डीएसपी (पोलिस अधीक्षक) पदावर नियुक्त करण्यात आले होते. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या प्रिया वर्मा यांनी २०१७ मध्ये पुन्हा मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा दिल्यावर संपूर्ण राज्यात चौथा क्रमांक मिळाला आणि उपजिल्हाधिकारी त्यांची निवड झाली. प्रिया या विवाहित असून त्यांना एक मुलगी आहे.
प्रिया या अनेकदा फेसबुक पेजवर नागरी सेवेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाशी संबंधित महत्वाच्या गोष्टी सांगत असतात. सध्या त्या आयएएस परीक्षेसाठी तयारी करत आहेत. प्रिया यांचे केस खेचून आणि पिळवणूक केल्याच्या आरोपावरून दोन जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती मिळत आहे.