मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Kirit Somaiya On Shivsena | राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या नाॅट रिचेबल आहेत. ते जवळपास 25 आमदारांसोबत गुजरातच्या एका हाॅटेलमध्ये आहेत. त्यामुळे शिवसेनेसह (Shivsena) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले असल्याची माहिती आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्वीट करत एक मोठा दावा केला आहे. सोमय्या (Kirit Somaiya On Shivsena) यांच्या ट्वीटच्या विधानावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
उद्धव ठाकरेंचे आता काऊंटडाऊन सुरू झाले आहे. किरीट सोमय्यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, “महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या निकालात शिवसेनेला (माफिया सेना) 52 मते मिळाली आहेत. 12 आमदारांचे बंड (55 शिवसेना + 9 समर्थक = 64) उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) माफिया सरकारचे काउंट डाऊन सुरू झाले आहे.” असं ट्विट करत सोमय्यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.
— Saurabh Joglekar (सौरभ जोगळेकर)• (@joglekarsaurabh) June 21, 2022
देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना –
विधान परिषद निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे.
सोमवारी रात्रीपासून शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे संपर्काबाहेर गेले होते. त्यांच्यासोबत शिवसेनेचे 25 आमदार असल्याची माहिती समोर आली होती.
सध्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेना आणि इतर अपक्ष आमदार असल्याची माहिती आहे.
सूरतमधील हॉटेलमध्ये 25 आमदार असल्याची माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आता दिल्लीला रवाना झाले आहेत. दरम्यान, फडणवीस हे भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) आणि गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांचीही भेट घेण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Web Title :- bjp leader kirit somaiya tweet on shivsena uddhav thackeray and eknath shinde
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update