मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Kishori Pednekar on Kirit Somaiya Injury | राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या गाडीवर हल्ला झाला. यामध्ये सोमय्यांना दुखापत (Injury) झाली होती, यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. महाराष्ट्राचं भाजप शिष्टमंडळ हल्ल्याप्रकरणी दाद मागण्यासाठी दिल्लीला गेलं आहे. अशातच यावर बोलताना शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या (Mumbai) माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमय्यांच्या (Kishori Pednekar on Kirit Somaiya Injury) जखमेची खिल्ली उडवली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मी किरीट सोमय्या यांची जखम पाहिली असून ती सुपरफिशीअल वाटते. दगड मारल्यानं जखम झाली असती तर रक्त येत राहिलं असतं.
जर काच लागली असती तर ती अडकली असती, दाढी करताना अशा प्रकारची जखम होण्याची शक्यता असल्याचं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी सोमय्यांवर (Kishori Pednekar on Kirit Somaiya Injury) निशाणा साधला.
सोमय्या जे घडलं ते सांगायला दिल्लीत (Delhi) गेले ते ठीक आहे पण येताना कलह आणू नका, सुबत्ता घेऊन या, असं पेडणेकर म्हणाल्या.
त्यासोबतच इथं अनेक पथकं यायचं असेल तर येऊ दे, कारण इथं अशी अनेक पथकं आलीत.
दिल्लीचा आधार महाराष्ट्र (Maharashtra) आणि मुंबईला मिळत नसल्याचं पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, स्पेशल टीम (Special Team) पाठवून झालेल्ला हल्ल्याची चौकशी करावी
आणि मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey)
यांच्या राजीनाम्याची मागणी किरीट सोमय्या यांनी दिल्लीमध्ये आपल्या शिष्टमंडळासह केली आहे.
Web Title :- kirit somaiya met union home secretary kishori pednekar criticized
हे देखील वाचा :
Cesarean Delivery | सिझेरियन प्रसूतीनंतर पुढील Pregnancy चं नियोजन कसे कराल? जाणून घ्या