बहुजननामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) स्टारर आणि फारुक कबीर (Faruk Kabir) डायरेक्टेड खुदा हाफिज (Khuda Haafiz) हा सिनेमा अलीकडेच रिलीज झाला होता. चाहत्यांचा याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता या सिनेमाचा सेकंड पार्ट रिलीज केला जाणार आहे.
डायरेक्टर फारुक कबीर यांनी एका मुलाखतीत बोलताना सिनेमाच्या सीक्वल बद्दल सांगितलं आहे. ते म्हणाले, या सीक्वलचं नाव खुदा हाफिज- एक अग्निपरीक्षा ठेवलं जाऊ शकतं. स्क्रीप्ट पूर्ण करण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी लागेल. मार्चमध्ये शुटींग सुरू केली जाऊ शकते. मी याबद्दल विद्युतला आधीच सांगितलं होतं.
असंही सांगितलं जात आहे की, आता मेकर्स याच्या स्टोरीवर जास्त जोर देणार आहेत. सिनेमात विद्युतची अॅक्शन कमी दिसण्याची शक्यता आहे. परंतु सीक्वलची माहिती समोर आल्यानंतर विद्युतच्या चाहत्यांची उत्सुकता मात्र आणखी वाढल्याचं दिसत आहे.
विद्युतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच त्यानं जंगली आणि कमांडो 3 सिनेमात काम केलं आहे. कमांडो 3 मध्ये अदा शर्मा, अंगिरा धर आणि गुलशन दैवेया यांचीही प्रमुख भूमिका होती. याशिवाय सिने निर्माता तिग्मांशु धूलिया याच्या डायरेक्शनमध्ये बनलेला त्याचा यारा हा सिनेमा 30 जुलै रोजी ZEE 5 वर रिलीज झाला आहे.