Khesari Lal Yadav New Song : ‘खेसारी लाल-चांदणी सिंह’चं नवं गाणं Out ! लेहंगा घालायलाच विसरली अभिनेत्री

बहुजननामा ऑनलाइन टीम – भोजपुरी इंडस्ट्रीचा सुपरस्टार खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav) आणि अॅक्ट्रेस चांदणी सिंह (Chandni Singh) यांचं एक गाणं सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या गाण्यात दोघं डान्स आणि रोमँस करताना दिसत आहे. खास बात अशी की, या गाण्यात खेसारी सोबत चांदणीचाही अतरंगी अवतार दिसत आहे.
सध्या खेसारीचं हे गाणं युट्युबवर ट्रेंड होताना दिसत आहे. हार गया मेहरारू से असं या गाण्याचं नाव आहे. भोजपुरी सिनमात खूप जास्त पसंत केलेलं रोमँस आणि डान्सनं भरपूर असं हे गाणं आहे. सध्या हे गाणं ट्रेंड करत असून याचे व्ह्युज सतत वाढताना दिसत आहे. हे गाणं वारंवार पाहिलं जात आहे.
या गाण्याची खास बात अशीय की, या गाण्यात चांदणी विचित्र पोषाख घालून दिसत आहे. तिनं सर्व लुक वधू सारखा केला आहे. परंतु लेहंगा घालण्याऐवजी शॉर्ट हॉट पँट घातली आहे. आणखी एक खासियत अशी आहे की, हे गाणं खेसारी लाल यादवनं स्वत: गायलं आहे. सध्या हे गाणं सोशलवरून तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून गाण्याला मोठी पसंती मिळताना दिसत आहे.
Comments are closed.