पुणे : – Khed Pune Crime News | तीन नराधमांनी हवस भागवण्यासाठी ओळखीच्या दोन अल्पवयीन मुलींना विश्वासात घेऊन त्यांना गुंगीचे इंजेक्शन देऊन त्यांच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे (Rape Case Pune). हा घटना मागिल महिन्यात 27, 28 एप्रिल रोजी खेड तालुक्यात घडला आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.
अजय भिकेन दौड (वय 29, रा. सातकरस्थळ, ता. खेड, जि. पुणे), श्रीराम संतोष होले (वय 23, रा. होलेवाडी, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी त्यांचा साथीदार किरण याच्याविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात (Khed Police Station) पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलींना आरोपी अजय आणि श्रीराम यांनी फिरायला नेण्याचा बहाणा करून शिरूर परिसरात नेले. तेथील एका डोंगरावर आरोपींचा मित्र किरण याने दोघींना इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला. इंजेक्शन घेतले नाही तर सोडून जाऊ अशी धमकी दिली. धमकीमुळे मुली घाबरल्या. किरणने दोघींना इंजेक्शन दिले. आरोपी अजय आणि श्रीराम यांनी दोघींना एका हॉटेलमध्ये नेले. हॉटेलमध्ये दोन खोल्या घेतल्या. त्यानंतर आरोपींनी दारु पिऊन त्यांच्यावर बलात्कार केला. घाबरलेल्या मुलींनी ही बाब लपवून ठेवली होती. मात्र, आरोपींनी दोघींना पुन्हा धमकावले. घाबरलेल्या मुलींना खेड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, महिला पोलीस उपनिरीक्षक माधवी देशमुख, डी. एन. राऊत, रामदास बोऱ्हाडे, प्रवीण गेंगजे, एस. डी. बांडे, स्वप्नील लोहार, सागर शिंगाडे, निलम वारे यांच्या पथकाने फरार झालेल्या दोन आरोपींना अटक केली आहे.