Khanapur Pune Crime News | दम असेल ये, म्हणणारा झाला ढेर ! सिंहगड परिसरात 2 टोळ्या भिडल्या; परस्परावर गोळीबार, कोयत्याने वार, एकाचा खून, 14 जणांना अटक

पुणे : Khanapur Pune Crime News | पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन खानापूर येथे दोन टोळ्या परस्परांशी भिडल्या. त्यात दोन्ही बाजूंकडून गोळीबार तसेच कोयते (Firing In Khanapur), लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला. यात एका गुंडाचा खून झाला असून काही जण जखमी झाले (Murder In Khanapur). महत्वाचे म्हणजे तुझ्यात दम असेल तर तू खानापूर चौकात ये, असा दम देणार्याचा खून झाला. या प्रकरणी हवेली पोलिसांनी परस्परांविरुद्ध खून आणि खूनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल केले असून १४ जणांना अटक केली आहे.
रोहित ऊर्फ भोर्या ढिले असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ओेकार धमेंद्र ढिले (रा. खानापूर, ता. हवेली) याने हवेली पोलीस ठाण्यात (Haveli Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मंगेश दारवटकर व त्यांच्या १३ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित ढिले व तेजस वाघ यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी किरकोळ भांडण झाले होते. याच्या रागातून शनिवारी रात्री रोहित ढिले याने तेजस वाघ याला फोन वरुन शिवीगाळ करुन तुझ्यात दम असेल तर तु खानापूर चौकात ये, असे म्हणाला. तेव्हा तेजस वाघ व त्याचे मित्र खानापूर येथे गेले. तेव्हा तेजस वाघ याने त्याने बंदुकीने हवेत फायर करुन रोहित ढिले याच्यावर लोखंडी रॉड, कोयत्याने वार करुन त्याचा खून केला.
त्याविरोधात सुरेश दशरथ तागुंदे यांनी हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहित याने आव्हान दिल्यावर तेजस वाघ व त्याचे मित्र खानापूर येथे गेले. तेव्हा रोहित व त्यांचे मित्र यश ऊर्फ माम्या जावळकर व इतरांनी बंदुकीतून सोमनाथ आनंता वाघ याच्यावर गोळीबार करुन त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी सुनिल पुजारी यांनी गुन्ह्याचा सखोल तपास करुन गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर (PI Avinash Shilimkar), हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे (PI Sachin Wangde) यांना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा (Pune LCB), हवेली व वेल्हा पोलीस यांची विशेष पथके तयार करुन गुन्ह्याचा तपास सुरु करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील आरोपींपैकी वेगवेगळ्या ठिकाणावरुन एकूण १४ आरोपींना अटक करण्यात आली. (Pune Rural Police)
मंगेश ऊर्फ मुन्ना मोहन दारवटकर (वय २५, रा. कोंडगाव, ता. हवेली), वैभव ऊर्फ सोन्या शिवाजी जागडे (वय २०, रा. आंबेड वरची आळी, ता. वेल्हा), सिद्धेश राजेंद्र पासलकर (वय २५, रा. आंबेड, ता. वेल्हा), प्रथमेश ऊर्फ भावड्या मारुती जावळकर (वय १८, रा. खानापूर, ता. हवेली), सुमीत ऊर्फ दादया किरण सपकाळ (वय २०), वैभव किशोर पवार (वय १८), तेजय चंद्रकांत वाघ (वय २४), गणेश अंकुश जावळकर (वय २३), आकाश ऊर्फ दादया आनंतर वाघ (वय २७, सर्व रा. खानापूर), वरुण रामदास दारवटकर (वय ३६, रा. आंबेड, ता. वेल्हा), मोहन सबाजी चोर (वय ५२, रा. तळेगाव दाभाडे), विकास ऊर्फ पांडा विलास नारगे (वय २६, रा. सांबरेवाडी, ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
हा गुन्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख (IPS Pankaj Deshmukh), अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे (Addl SP Ramesh Chopade), उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिलकुमार पुजारी (SDPO Sunil Pujari) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांचे सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक खामगळ, सागर पवार (API Sagar Pawar), पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत (PSI Abhijit Sawant) व स्थानिक गुन्हे शाखा, हवेली व वेल्हा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार यांच्या पथकाने उघडकीस आणला आहे.
Comments are closed.