Khadki Pune Crime News | पुणे: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, 40 वर्षीय नराधमाला अटक
पुणे : – Khadki Pune Crime News | दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला एका पडक्या खोलीत नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले (Sexual Harassment). याप्रकरणी खडकी पोलिसांनी (Khadki Police Station) 40 वर्षीय नराधमावर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करुन बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार बोपोडी (Bopodi) येथे 12 जुलै ते 18 जुलै या कालावधीत घडला आहे.
याबाबत पीडित मुलीच्या आईने खडकी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार नागेश येरपल नेल्ल्यु (वय-40 रा. बोपोडी मुळ रा. मद्रास (साऊथ इंडियन) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 75 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक रेणुका गालफाडे (PSI Renuka Galphade) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पेंटरचे काम करत असून तो साऊथ इंडियन आहे. आरोपीने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिला धमकावून एका पडक्या खोलीत घेऊन गेला.
त्याठिकाणी त्याने मुलीसोबत अश्लील चाळे करुन तीच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. आरोपी वारंवार त्रास देत असल्याने पीडित मुलीने याबाबत आईला सांगितले. आईने खडकी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. त्यानंतर आरोपीचा शोध घेऊन गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा तासात आरोपीला अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास पीएसआय रेणुका गालफाडे करीत आहेत.
Comments are closed.