पुणे न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – खडकवासला धरण (Khadakwasla Dam) क्षेत्रात पडणाऱ्या (Rain) संतधार पावसामुळे खडकवासला धरण (Khadakwasla Dam) आज (गुरुवार) पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज संध्याकाळपासून धरणातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
'खडकवासला'तून २ हजार ४६६ क्युसेकनं विसर्ग !
खडकवासला धरणात आज दुपारी ३:०० वाजेपर्यंत १.७५ टीएमसी (८८.५२%) पाणीसाठा झाला आहे. धरण क्षेत्रामध्ये अतिपर्जन्यमानामुळे आज ठीक दु. ४:३० वा. २ हजार ४६६ क्युसेकने विसर्ग करण्यात येणार आहे. त्यानंतर विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 22, 2021
खडकवासला धरण साखळीतील चारही धरण परिसरात संततधार पाऊस (Heavy rain) सुरु आहे. यामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. दरम्यान, खडकवासला धरणात आज चार वाजेपर्यंत 95 टक्के पाणीसाठा जमा होईल. त्यानंतर संध्याकाळी साडेचार वाजता किमान 2400 क्यूसेक पाणी खडकवासला धरणातून मुठा नदीत (Mutha River) सोडले जाणार आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे उपअभियंता (Deputy Engineer, Irrigation Department) पोपट शेलार यांनी सांगितले.
#Alert | खडकवासला धरणात वेगानं पाण्याची आवक होत असून पावसाचा जोर कायम राहिल्यास आज संध्याकाळी धरणातून मुठा पात्रता पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. 'खडकवासल्या'वरील तीनही धरणे अजून भरलेली नसल्याने विसर्ग तुलनेने कमी असेल, तरीही आपण सर्वांनी काळजीच घेतलेली बरी !#punerains
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 22, 2021
महापौरांचे नागरिकांना आवाहन
खडकवासला धरणात आज दुपारी तीन वाजेपर्यंत 1.75 टीएमसी (88.52 टक्के) पाणीसाठा झाला आहे. धरण क्षेत्रामध्ये अति पर्जन्यमानामुळे आज दुपारी साडेचार वाजता 2 हजार 466 क्युसेकने विसर्ग करण्यात येणार आहे. त्यानंतर विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. खडवासला धरण साखळीतील धरणे अजून भरलेली नाहीत. त्यामुळे विसर्ग तुलनेने कमी असेल, तरीही आपण सर्वांनी काळजी घेतलेली बरी, असे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी म्हटले आहे.
Web Title : Khadakwasla Dam | Discharge from Khadakwasla Dam, a warning to the citizens along the river
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 333 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी