Ketki Chitale | शरद पवारांबद्दलचं आक्षेपार्ह वक्तव्य केतकी चितळेला भोवलं ! ठाणे पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Ketki Chitale | अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याविषयी सोशल मिडियावर आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. तिने फेसबूकवरुन आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राष्ट्ववादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच केतकी चितळेवर कारवाई करण्याची मागणी देखील राष्ट्रवादीकडून (NCP) करण्यात आली आहे. दरम्यान आता एक मोठी माहिती समोर येत आहे. केतकी चेतळेला ठाणे पोलिसांनी (Thane Police) ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर येत आहे. (Marathi actress Ketaki Chitale has been taken into custody by Thane police)
#UPDATE | Marathi actress Ketaki Chitale has been taken into custody by Thane police.
— ANI (@ANI) May 14, 2022
अभिनेत्री केतकी चितळे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शरद पवार यांच्या विरोधातील आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट करणं अभिनेत्री केतकी चितळेला चांगलेच महागात पडले आहे. आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला ताब्यात घेतलं आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
ठाणे पोलिसांचे व नवी मुंबई पोलिसांचे अभिनंदन आभार #ketakichitale ला घेतले ताब्यात #केतकीचितळे
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 14, 2022
Web Title :- Ketki Chitale | Ketki Chitale made the offensive statement about NCP chief Sharad Pawar ! Thane police took him into custody
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा :
Rajya Sabha Election 2022 | महाराष्ट्रातून राज्यसभेवर विनोद तावडे, पियुष गोयल?; भाजपच्या गोटात खलबतं
Ration Card Rule | मोठी बातमी ! सरकारने रेशन घेण्यासाठी बनवला नवीन नियम, तुम्ही जाणून घेणे आवश्यक
Comments are closed.