Ketaki Chitale Send To Police Custody | ‘या’ प्रकरणातही अभिनेत्री केतकी चितळेला 5 दिवसांची पोलीस कोठडी

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Ketaki Chitale Send To Police Custody | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) सध्या पोलिस कोठडीत आहे. त्यामध्ये केतकीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. केतकीला 5 दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. अॅट्रॉसिटी प्रकरणात (Atrocity Case) ठाणे सेशन कोर्टाने (Thane Sessions Court) केतकीला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 25 मे रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर पुढचा निर्णय देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. (Ketaki Chitale Send To Police Custody)
‘नवबौद्ध, 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क’, आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो.’ नवबौद्धांसंदर्भातलं असं वक्तव्य केतकीने (Ketaki Chitale Facebook Post) फेसबुकवर केलं होतं. यानंतर तिच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (Atrocity Act) गुन्हा (FIR) दाखल केला होता.
दरम्यान, पोलिसांनी तिच्या घरी जाऊन तिचा लॅपटॉप आणि अन्य काही गोष्टीही ताब्यात घेतल्या होत्या. केतकीचा मोबाईलही पोलिसांच्या ताब्यात आहे. तिच्या लॅपटॉप आणि मोबाईलची सायबर सेलकडून तपासणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल ठाणे गुन्हे शाखेला (Thane Police Crime Branch) सोपवण्यात आला. पण, या अहवालातील नेमका तपशील अजून पुढे आला नाही. दरम्यान, ॲट्रॉसिटी प्रकरणी केतकीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Web Title : Ketaki Chitale Send To Police Custody | ketaki chitale send to police custody for 5 days in atrocity case
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा :
PMKMY | शेतकर्यांना दरमहिना 3 हजार रुपये पेन्शन, PM किसानचे खातेधारक असा घेऊ शकतात लाभ; जाणून घ्या
Comments are closed.