बहुजननामा ऑनलाइन टीम – पिंपरी चिंचवडच्या ( Pimpari Chinchwad) उपमहापौरपदी सत्ताधारी भाजपचे ( BJP) नगरसेवक केशव घोळवे ( Keshav Gholve) यांची बिनविरोध निवड झाली आहे. घोळवे यांना पाच महिन्यासाठी हि संधी मिळाली असून त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP) निकिता कदम ( Nikita Kadam) यांनी माघार घेतल्याने घोळवे यांची बिनविरोध निवड झाली. उपमहापौर तुषार हिंगे ( Tushar Hinge) यांनी 14 ऑक्टोबरला तडकाफडकी उपमहापौरपदाचा राजीनामा दिल्याने निवडणूक झाली. शुक्रवारी महापालिकेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभेत निवडणूक प्रक्रिया पार पडली. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार ( Kunal Khemnar) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. यामध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता.सभागृह नेते नामदेव ढाके, केशव घोळवे(Keshav Gholave) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अर्ज माघार घेण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देत कदम यांनी माघार घेतली.
निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची माघार
या निवडणुकीत विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून निकिता कदम यांनी अर्ज दाखल केला होता. तर भाजपच्या वतीने मोरवाडीमधील नगरसेवक केशव घोळवे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे बहुमत असल्याने त्यांची निवड पक्की समजली जात होती. संख्याबळ नसल्याचे आणि कोरोनाचे कारण देत नुकत्याच झालेल्या प्रभाग समिती, विषय समिती सभापतीपदाची निवडणूक न लढविणाऱ्या विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने उपमहापौरपदाच्या निवडणुकीत उडी घेतली होती. परंतु अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकिता कदम यांनी माघार घेतल्याने घोळवे यांची बिनविरोध निवड झाली.
………..
उर्वरित कालखंडात दोन जणांना संधी
उर्वरित वर्षात उपमहापौर पदासाठी दोन जणांना संधी द्यायची असल्याने घोळवे यांना पाच महिन्यांसाठी संधी देण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. घोळवे यांच्याआधी आमदार महेश लांडगे यांचे समर्थक व मोशीचे नगरसेवक वसंत बोराटे यांचे नाव निश्चित झाले होते. मात्र भाजपातील काही कार्यकर्त्यांनी घोळवे यांच्यासाठी मोर्चेबांधणी केली. पडद्यामागील अनेक नाटय़मय घडामोडीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घोळवे यांचे नाव निश्चित केल्यानंतर आमदार महेश लांडगे यांचा गट नाराज झाला.परंतु पक्षात नाराजी पसरू नये यामुळे घोळवे यांना पाच महिन्याची संधी देण्यात आली आहे.